मुंबई : देशातच नाही तर संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. सर्वच राष्ट्र कोरोनावर लस काढण्याच्या मार्गावर आहेत. काही देशांमध्ये कोरोना लसीकरणाची सुरूवात देखील करण्यात आली आहे. तर काही देशात कोरोनाची दुसरी लाट आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अशात खबरदारीचा उपाय म्हणून नव्या वर्षीच सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू करण्यात येईल अशी माहिती मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल चहल यांनी माहिती दिली आहे. शिवाय त्यांनी मुंबईत नाईट कर्फ्यू लावण्याची मागणी मुख्यमंतत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयुक्त चहल यांनी यासंबंधी राज्य सरकारला पत्र देखील लिहिलं आहे. हे पत्र लिहित त्यांनी नईट क्लब्ज आणि मुंबईकरांच्या बेजबाबदार वागण्यामुळे रात्री ११ वाजल्यापासून ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. 


मात्र राज्य सरकार कर्फ्यू लावण्याची तयार नसल्याची माहिती देखील समोर येत आहे. २५ डिसेंबरनंतर राज्यातील परिस्थिती लक्षात घेवून निर्णय घेवू अशी राज्य सरकारची भूमिका असल्याचं  मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल चहल यांनी सांगितलं आहे. 


दरम्यान, गणपतीनंतर राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्यानंतर काही दिवसांत देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट देखील झाली. मात्र दिवाळीमध्ये नागरिक मोठ्या प्रमाणात बाहेर पडले. त्यामुळे मुंबईत कोरोनाची दुसरी लाट येईल, अशी भीती व्यक्त करण्यात आली.