`राधे माँ`चं गूढ आणखी वाढलं, दरबारात रासलिला नाही तर...
राधे माँ या नावाचे गुढ दिवसेंदिवस वाढतच चाललय.
राकेश त्रिवेदी, प्रतिनिधी, झी मीडिया, मुंबई : राधे माँ या नावाचे गुढ दिवसेंदिवस वाढतच चाललय. आता या सगळ्या प्रकरणात झी मीडियाने एक नवं सत्य समोर आणलय. राधे माँचे दरबारात नाचणे, गाणे , हसणे, रडणे या रासलिला नसून तो एक मानसिक आजार असल्याचे आता उघड झालंय.
राधे माँचे उपचार सुरू
राधे माँचा एक फार मोठा भक्तपरिवार आहे जो मिटल्या डोळ्यांनी सुखविदंर कौर नावाला देवीचा अवतार समजतो. पण झी मीडिया त्याच मिटल्या डोळ्यांना जाग आणणारं सत्य समोर आणणार आहे. राधे माँने गेल्या काही दिवसात मुलाखतीचा सपाटा लावलाय. याच दरम्यान राधे माँ एका मानसिक आजाराने त्रस्त असून ती सध्या मनोचिकीत्सकाकडे उपचार घेत असल्याचे समोर आलय.
बाईपोलर डिसऑर्डर म्हणजे काय?
राधे माँचे भक्तगणांसमोर हसणे, नाचणे, गाणे, आणि अचानक रडणे या सगळ्या गोष्टी म्हणजे रासलिला नसून तिच्या मानसिक आजाराचे लक्षण आहे. आणि या आजाराचे नाव आहे बाईपोलर डिसऑर्डर. बाईपोलर डिसऑर्डर या रोगात मानवी स्वभावात बदल होत राहतात. यामध्ये दोन डिप्रेशन अटॅक आणि मिनीएक असे दोन प्रकार दिसतात. राधे माँच्या तपासणीत बॉर्डर लाईन पर्सनालिटी डिसऑर्डर असल्याचे समोर आलाय. या व्याधीत रुग्णाला आपण जे काही करतोय त्याबद्दल काहीच कळत नाही.
आजारावर नियंत्रण मिळवणं शक्य
आम्ही या सगळ्याबाबत डॉक्टरांशी बोललो तेव्हा या मानसिक आजारावर नियंत्रण मिळवणे शक्य असल्याचा डॉक्टरांचा विश्वास आहे. खुद्द राधे माँ हिच्याशी याबाबत बोलण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तिची प्रतिक्रिया या सगळ्याला साजेशी अशीच होती.
राधे माँला डॉक्टरांचा सल्ला
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राधे माँ स्वत: मनोचिकित्सांकडे उपचारासाठी जात असून तिला जास्त झोपेची गरज असल्याचा सल्ला देण्यात आलाय. दरबार आणि चौकी हे प्रकार वाढत राहिल्यास राधे माँला यासगळ्यात जास्त त्रास होईल असाही सल्ला देण्यात आलाय. याच सगळ्या प्रकारातून सुखविंदर कौर राधे माँ झालीय पण आता डॉक्टरांचा सल्ला ऐकून राधे माँ पुन्हा सुखविंदर कौर होणार का या प्रश्नाचे उत्तर आता राधे माँलाच ठाऊक.