मुंबई : सहा दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेल्या इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी गुरुवारी शालोम बॉलीवूड कार्यक्रमात सहभाग घेतला होता. त्यांच्यासह यावेळी त्यांची पत्नी साराही उपस्थित होती. 


इस्त्रायलचे बॉलीवूड प्रेम


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी नेतान्याहू यांनी बॉलीवूडचे तोंडभरुन कौतुक केले. संपूर्ण जग बॉलीवूडवर प्रेम करते. इस्त्रायलचेही बॉलीवूडवर प्रेम आहे असे नेतान्याहू यावेळी म्हणाले. तसेच भाषण संपताना त्यांनी जय हिंद, जय महाराष्ट्र, जय इस्त्रायल असा नाराही दिला. 


बिग बींना सेल्फीचा मोह आवरला नाही


या कार्यक्रमात बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासह अनेक बॉलीवूडचे कलाकार उपस्थित होते. अभिनेत्री ऐश्वर्या रायने या दोघांचे पुष्पगुच्छ देत त्यांचे स्वागत केले. 
यावेळी बिग बींना नेतान्याहू यांच्यासह सेल्फी घेण्याचा मोह काही आवरला नाही. बिग बी यांच्यासह ऐश्वर्या, अभिषेक बच्चन, करण जोहर, सुभाष घई, इम्तियाज अली, रॉनी स्क्रूवाला, सारा अली खान आणि इतर सेलिब्रेटी उपस्थित होते. 



 


अमिताभ यांना भेटून खूप आनंद झाला. मी निशब्द झालोय. त्यांच्याकडे माझ्यापेक्षा ३ कोटीहून अधिक ट्विटर फॉलोअर्स आहेत, असेही पुढे नेतान्याहू म्हणाले. इस्त्रायलचे पंतप्रधान रविवारी सहा दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले होते.