प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई : पुण्यात जाहिरात फलकाचा सांगाडा कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या धोकादायक जाहिरात फलकांचा मुद्दा ऐरणीवर आलाय. मुंबई महापालिकेच्या माहितीनुसार संपूर्ण मुंबईत केवळ १ हजार ३१० अधिकृत जाहिरात फलक आहेत. प्रत्यक्षात मात्र मुंबईतही हजारोंच्या संख्येनं अनधिकृत जाहिरात फलक आहेत.


पालिका की रेल्वे ?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महापालिकेनं गेल्या वर्षात ७ हजार ११० अनधिकृत जाहिरात फलकांवर कारवाई केलीय.


यामध्ये सर्वात जास्त ३ हजार २३६ जाहिरात फलक हे राजकीय पक्षांचे आहेत. जाहिरात फलकांचा आकार हा पालिका आणि रेल्वे प्रशासनातील वादाचा मुद्दा आहे. 


नियमबाह्य फलक 


नियमानुसार तीस बाय दहा ते जास्तीत जास्त ४० बाय ४० इतक्या आकारमानाइतकेच जाहिरात फलक लावता येतात.


तसंच दर दोन महिन्यांनी संरचनात्मक लेखापरीक्षण करुन त्याचा अहवाल पालिकेला देणं आवश्यक असते. मात्र रेल्वे प्रशासनाला ही नियमावली लागूच होत नाही.


रेल्वे प्रशासनाच्या अधिकारक्षेत्रात १५० बाय १०० एवढी मोठे जाहिरात फलक आढळतात.


नियमापेक्षा मोठ्या आकारमानाचे जाहिरात फलक मुंबईतील पश्चिम द्रुतगती मार्ग, पेडर रोडसह मुख्य रस्त्यांवर आढळतात.