दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : कर्जमाफीचा आर्थिक बोजा लक्षात घेऊन राज्य सरकारने आपल्या सर्वच योजनांच्या निधीत कपात करण्यास सुरुवात केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकताच जिल्हा विकास निधीत कपात करण्याच्या निर्णय समोर आल्यानंतर आता जलयुक्त शिवार योजनेसाठी दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांच्या रकमेतही कपात करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. 


ही कताप तीस टक्के इतकी असणार आहे. जलयुक्त शिवारच्या पुरस्कारांसाठी संपूर्ण राज्यात ८ कोटी ९६ लाख रुपयांचा निधी दिला जायचा. मात्र यात १ कोटी २६ लाख रुपयांची कपात करून तो ७ कोटी ७० लाख इतका करण्यात आला आहे. 


पुणे विभागाला देण्यात येणाऱ्या ४८ लाखांऐवजी आता ३६ लाख रुपये देण्यात येणार आहेत. तर कोकण विभागासाठी २ कोटी ६६ लाख रुपयांमध्ये कपात करून ती १ कोटी ९९ लाख करण्यात आली आहे. 


अमरावती विभागासाठी असलेल्या १ कोटी १५ लाख रुपयांच्या रकमेत कपात करून ती ८६ लाख रुपये करण्यात आली आहे. नाशिक विभागासाठी ७६ लाखांऐवजी ५७ लाख, नागपूर विभागासाठी १ कोटी २६ लाखांऐवजी ९४ लाख, औरंगाबाद विभागासाठी १ कोटी ४८ लाखांऐवजी १ कोटी ११ लाख रुपयांची तरतुद आता असणार आहे.