मुंबई : पश्चिम रेल्वेवर आज सांताक्रूझ ते गोरेगाव या स्थानकांदरम्यान जम्बो ब्लॉक घेण्यात आला आहे. सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ या वेळेत हा जम्बोब्लॉक घेतला जाणार आहे. हा ब्लॉक अप आणि डाऊन अशा दोन्ही स्लो मार्गांवर असणार आहे. त्यामुळे सांताक्रूझ ते गोरेगाव स्थानकांमध्ये अप आणि डाऊन स्लो मार्गांवरील गाड्या फास्ट मार्गांवरून चालवण्यात येणार आहेत. तसंच सर्व स्लो लोकलना विलेपार्ले स्थानकातील फास्ट मार्गावरील प्लॅटफॉर्म क्र. ५ आ​णि ६ वर विशेष थांबा देण्यात येणार आहे.


राममंदिर रेल्वे स्थानकात फास्ट मार्गिकेसाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध नसल्याने त्याठिकाणी गाड्या थांबणार नाहीत. या जम्बो ब्लॉकमुळे काही लोकल रद्द करण्यात आल्या आहेत तर मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावर आज कोणताही मेगाब्लॉक घेतला जाणार नाही. २९ ऑगस्टच्या पावसामुळे मध्य रेल्वेच्या 35 गाड्या नादुरुस्त झाल्यात त्याचा मध्य रेल्वेला मोठा फटका बसला आहे. यामुळे लोकलच्या अनेक फे-या रद्द कराव्या लागल्यात त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून मध्य रेल्वेनं आज ब्लॉक न घेण्याचा निर्णय घेतला आहे.