मुंबई : प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar)यांनी वारिस पठाण (Waris Pathan, AIMIM) यांच्या वक्तव्यावर चांगलाच समाचार घेतला आहे. त्याचवेळी जोरदार टीका केली आहे. वारिस तू कुणाची नोकरी करतोस, असा सवाल जावेद अख्तर यांनी  केला. त्याचवेळी त्यांनी मुस्लीम लीग आणि संघावरही टीका केली. मुस्लिम लीग आणि RRS हे इंग्रजांचे एजंट होते. RSS आणि मुस्लिम लीगचा नेता अर्ध्या तासासाठीही जेलमध्ये गेला नाही. स्वातंत्र्य चळवळीला तोडण्याच काम या दोघांनी पूर्ण शक्तीने केले, असं जावेद अख्तर म्हणालेत. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एमआयएमचे नेते वारीस पठाण यांच्या एका विधानामुळे वाद निर्माण झाला आहे. धार्मिक तेढ निर्माण होईल, असं वक्तव्य जाहीर सभेत केल्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी वारिस पठाण यांच्या वक्तव्यावर जोरदार टीका केलीय. वारिस तू कुणाची नोकरी करतोयस, असा सवाल त्यांनी केला. त्याचवेळी त्यांनी मुस्लीम लीग आणि संघावरही टीका केली. कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित जागर सभेत ते बोलत होते. बदल घडवायचा असेल तर आता मेणबत्ती पेटवून चालणार नाही तर मशाल हाती घ्यावी लागेल असं मत गांधी फाउंडेशनचे अध्यक्ष तुषार गांधी यांनी यावेळी व्यक्त केलं.


दरम्यान, वारीस पठाण यांनी हे विधान भाजपच्या सांगण्यावरून केल्याचा खळबळजनक आरोप गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. यांच्यासारख्यांना समाजातूनच हाकलून दिलं पाहिजे, असं म्हणत त्यांनी पठाण यांच्यावर तिखट शब्दांत टीका केलीये. तर सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनीही पठाण यांचं हे विधान अत्यंत चुकीचं असल्याचं म्हटलंय. तर दगडाला उत्तर दगडानं आणि तलवारीला उत्तर तलवारीनं मिळेल, असं मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडेंनी म्हटले आहे.