छात्रभारतीच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली, विद्यार्थ्यांची धरपकड
छात्रभारती विद्यार्थी संघटनेच्या वतीने आयोजित केलेल्या राष्ट्रीय छात्र संमेलनाला परवानगी नाकारण्यात आली आहे.
मुंबई : छात्रभारती विद्यार्थी संघटनेच्या वतीने आयोजित केलेल्या राष्ट्रीय छात्र संमेलनाला परवानगी नाकारण्यात आली आहे. भीमा कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचाराच्या आणि महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर ही परवानगी नाकारण्यात आली आहे.
परवानगी नाकारली
छात्र भारती संघटनेचा अध्यक्ष दत्ता ढगे याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर कार्यक्रम स्थळी मोठी गर्दी झाली आहे. पोलिसांकडून विद्यार्थ्यांची धरपकड सुरू आहे. विलेपार्लेतील भाईदास सभागृहात कार्यक्रम होणार होता. छात्रभारती विद्यार्थी संघटनेच्या या कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात आल्याने हा कार्यक्रम होणार नाहीये. जिग्नेश मेवाणी आणि उमर खालिद हे दोघे आज मुंबईत हजेरी लावणार होते.
भाईदास सभागृहाबाहेर जमलेल्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी हुसकावून लावलंय. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर भाईदास सभागृबाहेर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय. भाईदास सभागृहाला अक्षरक्षा छावणीचं स्वरुप प्राप्त झालंय.
#Mumbai: Students gathered for Chhatra Bharati event outside Bhaidas Hall, being forcibly removed pic.twitter.com/eGT36BvQov
हेही होते वक्ते?
विलेपार्ले येथील भाईदास सभागृहात गुरुवारी सकाळी ११ पासून संध्याकाळी ५ वाजेपर्यंत हे संमेलन पार पडणार होते. यात विद्यार्थी नेत्या रिचा सिंग, प्रदीप नरवाल, बेदाब्रता गोगई आणि छात्रभारतीचे अध्यक्ष दत्ता ढगे हे विद्यार्थ्यांशी संवाद साधणार होत्या. भीमा कोरेगाव प्रकरण आणि महाराष्ट्र बंद नंतर जिग्नेश मेवाणी आणि उमर खालिद काय बोलणार, याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलं होतं.