मुंबई : मराठा क्रांती मोर्चाला मुंबईत उत्साहात सुरुवात झाली आहे. मोर्चासाठी प्रचंड गर्दी मराठा बांधवांनी केली आहे. राज्यभरातून मराठा माणूस मोर्चात सहभागी होण्यासाठी मुंबईत दाखल झाला आहे. दुसरीकडे विरोधी पक्षातील नेते आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी शिवसेनेला आव्हान केलं आहे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनेला आव्हान करत म्हटलं आहे की, 'सत्ताधारी पक्षाचे आमदार ओरडत आहे आरक्षण द्या. वकील चुकीचे लावले गेले. सत्ताधारी पक्षातील सगळ्यांना आव्हान खास करून शिवसेनेला आव्हान करो की एक ओळीचा ठराव आणावा. आम्ही एकत्रित ठरावला पाठिंबा देऊ.'


मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर विधीमंडळात गोंधळ होण्याची शक्यता आहे. सरकारच्या निर्णयाकडे सर्वांच लक्ष लागून आहे. अशाच राष्ट्रवादीकडून शिवसेनेला आव्हान करण्यात आलं आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपला शह देण्याचा प्रयत्न होऊ शकतो.