मुंबई : राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना करोनाचा संसर्ग झाला होता. ते आता कोरोनाच्या विळख्यातून बाहेर पडले आहेत.  त्यांना रुग्णालयातून सुटी मिळाली असून, ते घरीही पोहोचले आहेत. त्यांनी कोरोनावर मात केली असली तरी डॉक्टरांनी पुढील एक महिना सक्तीची विश्रांती करण्यास सांगितले आहे. या काळात मला कुणीही भेटायला येऊ नये अशी विनंती त्यांनी केली आहे. एक महिन्याच्या विश्रांतीनंतर मी आपल्या सेवेत आणि सोबत कायम असेल, असं देखील ते म्हणाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जितेंद्र आव्हाड यांनी एक कविता लिहून आपला आनंद व्यक्त केला आहे. 'अपने कदमों के काबिलियत पर, विश्वास करता हूं.. कितनी बार तूटा लेकीन, अपनो के लिये जीता हूं... चलता रहूंगा पथपर, चलने मैं माहीर बन जाऊंगा.. या तो मंजिल मिल जायेगी, या अच्छा मुसाफिर बन जाऊंगा.' 


त्यांच्यावर मुलुंड येथील फोर्टिस रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. कोरोनाच्या विळख्यातून सुखरूप बाहेर पडल्यानंतर त्यांनी डॉक्टर्स ,नर्सेस ,वॉर्डबॉय आणि इतर सर्व रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे आभार मानले. 


राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या १३ कार्यकर्त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. आव्हाडांच्या या १३ कार्यकर्त्यांसोबतच एका माजी नगरसेवकालाही कोरोना झाला होता. यासोबतच ठाण्यात एक पीएसआय आणि २ कॉन्स्टेबल अशा एकूण ३ पोलिसांची कोरोना टेस्टही पॉझिटिव्ह आल्या होत्या.