मुंबई: गेल्या काही दिवसांपासून देशभरात सातत्याने सुरु असलेल्या इंधन दरवाढीवरून राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मोदी सरकारला टोला लगावला आहे. आव्हाड यांनी ट्विटरवरून मोदी सरकारवर उपरोधिकपणे निशाणा साधताना म्हटले आहे की, घरबसल्या पैसे कमवा... संध्याकाळनंतर पेट्रोल डिझेल विकत घ्या आणि सकाळी विका. आत्मनिर्भर व्हा. या ट्विटमध्ये आव्हाड यांनी मॉर्फ केलेला एक फोटोही पोस्ट केला आहे. या  फोटोत पेट्रोल पंपावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पोस्टर असून त्यावर अक्कड बक्कड बंबे बो, ८०, ९० पूरे १०० असं लिहिलेले आहे. तसेच देशाचा जीडीपी G- Gas, D-Diesel, P- Petrol वाढतोय, असा खोचक टोलाही त्यांनी मोदी सरकारला लगावला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमिताभ बच्चन, अक्षय कुमार आता गप्प का; आव्हाडांचा खोचक सवाल

गेल्या काही दिवसांपासून देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती सातत्याने वाढत आहेत. पहिल्यांदाच डिझेलचा दर हा पेट्रोलपेक्षा जास्त झाला आहे. त्यामुळे मोदी सरकारला लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. यापूर्वी जितेंद्र आव्हाड यांनी काँग्रेस सरकारच्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीवरून आवाज उठवणाऱ्या सेलिब्रिटींनाही लक्ष्य केले होते. आव्हाड यांनी अभिनेता अक्षय कुमार, महानायक अमिताभ बच्चन आणि भाजप नेत्या स्मृती ईराणी यांचे इंधन दरवाढीचे जुने ट्विट रट्विट करून त्यांना आता वाढलेल्या इंधन दरवाढीवरून खोचक सवाल विचारले होते. 


भारताचं सोडा, पाकिस्तानमधील पेट्रोलची दरवाढ पाहून भरेल धडकी