नवी मुंबई : 2019 विधानसभेतच्या प्रचारात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी 'मी पुन्हा येईन' असं म्हणत आपणच सत्तेत कायम असू असा विश्वास व्यक्त केला होता. त्यानंतर याच लाईनवरुन फडणवीस यांनी कॅम्पेन देखील सुरु केलं. फडणवीस यांचं 'मी पुन्हा येईन' हे वक्तव्य चांगलचं गाजलं. आता पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यावरुन राजकीय वर्तुळात नविन चर्चा सुरु झाली आहे.


'आजही मुख्यमंत्री आहे'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवी मुंबईत एका कार्यक्रमाला संबोधित करताना देवेंद्र फडणवीस यांनी 'मला असं वाटतं की मी आजही मुख्यमंत्रीच आहे' असं विधान केलं आहे. तुमच्या सारखे नेते पाठिशी असल्यामुळे मला एकही दिवस जाणवला नाही की मी मुख्यमंत्री नाही, मला असं वाटतं की मी आजही मुख्यमंत्रीच आहे. तुम्ही मला त्याची कमतरता जाणवू दिली नाही. मनुष्य कोणत्या पदावर आहे ते महत्त्वाचं नाही तो काय करतो हे महत्त्वाचं आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.


विरोधी पक्ष नेता म्हणून उत्तम काम


गेली दोन वर्ष घरात एकही दिवस न थांबता मी जनतेच्या सेवेमध्ये आहे त्यामुळे मला कधीही जनतेने हे जाणवू दिलं नाही, की आता मी मुख्यमंत्री नाहीए, विरोधी पक्ष नेता म्हणून मी उत्तम काम करतोय, आणि ज्या दिवशी आशिर्वाद मिळेत त्या दिवशी पहिल्यांदाच इथं गोवर्धनी मातेकडेच येणार आहे. त्यामुळे त्याची काळजी करण्याचं कारण नाही, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.


मंदा म्हात्रे यांचं कौतुक


भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी रुग्णवाहिका आणि फिरते शौचालय यांच्या लोकार्पण कार्यक्रमचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात बोलताना फडणवीस यांनी आमदार मंदा म्हात्रे यांच्या कामाचं कौतुक केलं. घरातील उर्जावान स्त्री जेव्हा लोकप्रतिनिधी होते त्यावेळेस आपल्या कुटुंबाप्रमाणेच आपल्या शहराची आपल्या मतदारसंघाची काळजी ही स्त्री घेत असते, तेच आम्हाला मंदाताईंमध्ये पाहिला मिळतं, सातत्याने कुटुंबाप्रमाणे आपल्या लोकांची काळजी करत भूमीपूत्रांचे विषय असो, आगरी कोळी समाजाचे विषय असो, महिलांचे, लहान मुलं आबालवृद्ध अशा सर्वांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम त्या सातत्याने राबवत असतात, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं


आता महापालिका निवडणुका होणार आहेत आणि तुमची विकासकामं लोकांनी पाहिलं आहे, त्यामुळे जनतेचा आशिर्वाद पुन्हा मिळेल, आणि या नवी मुंबईची सेवा करण्याकरता या नेत्यांच्या नेतृत्वामध्ये पु्न्हा एकदा पाहिला मिळेल असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.