पश्चिम रेल्वेवर आज रात्रीपासून ‘जम्बो ब्लॉक’; तर मध्य रेल्वेवर रविवारी रखडपट्टी
हा ‘जम्बो ब्लॉक’ रात्री 11 पासून 14 तासांचा असणार आहे.
मुंबई : पश्चिम उपनगरीय रेल्वे मार्गावर शनिवार रात्रीपासून जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ‘जम्बो ब्लॉक’ रात्री 11 पासून 14 तासांचा असणार आहे. पोईसर पुलाच्या कामासाठी बोरिवली ते कांदिवलीदरम्यान दोन्ही जलद मार्गावर हा ‘ब्लॉक’ असेल.
या ‘जम्बो ब्लॉक’मुळे बोरिवली-गोरेगावदरम्यान धिम्या मार्गावरून लोकल धावतील. शनिवारी रात्री 11 ते रविवारी दुपारी 1.30 वाजेपर्यंत हा ‘मेगा ब्लॉक’ असणार आहे.
या ब्लॉकमुळे विरारच्या दिशेने जाणाऱ्या मेल, एक्स्प्रेस अंधेरी-बोरीवलीदरम्यान पाचव्या मार्गावरून धावतील. तर मुंबई सेन्ट्रलच्या दिशेने येणाऱ्या मेल, एक्स्प्रेस बोरीवली-गोरेगावदरम्यान अप लोकल मार्गावरून धावतील.
दुसरीकडे मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर रविवारी सकाळी 10.55 पासून दुपारी 3.55 पर्यंत सीएसएमटी-विद्याविहारदरम्यान दोन्ही धिम्या मार्गावर ‘मेगा ब्लॉक’ असणार आहे. या कालावधीत सीएसएमटीतून सुटणाऱ्या धिम्या लोकल विद्याविहापर्यंत जलद मार्गावर चालवण्यात येणार आहे.
या मेगाब्लॉकमुळे भायखळा, परेल, दादर, माटुंगा, शीव, कुर्ला स्थानकामध्ये ट्रेन थांबतील. त्यानंतर पुन्हा धिम्या मार्गावर लोकल वळवण्यात येतील. सीएसएमटीच्या दिशेने येणाऱ्या धिम्या लोकलही विद्याविहारपासून जलद मार्गावर धावतील.