मुंबई : मल्हार पिक्चर्स कंपनी प्रस्तुत, नॉटी पेंग्विन प्रोडक्शन आणि बियाँड इमॅजिनेशन फिल्म्स निर्मित, क्रोम फिल्म्स लिमिटेडच्या सहयोगाने ८ मार्चला प्रदर्शित झालेल्या 'कन्नी' चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले. काही ठिकाणी चित्रपट हाऊसफुल देखील जात आहे. बऱ्याच लोकांनी या चित्रपटाबद्दल चांगला प्रतिक्रिया दिल्या आहे आणि चित्रपटाचे भरभरून कौतुकही केले आहे. या चित्रपटातील सगळीच गाणी प्रेक्षकांना आवडली. आता यातील एक रोमँटिक गाणे सोशल मीडियावर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'कधी कशी' असे या गाण्याचे बोल असून निधी हेगडे हिने हे सुंदर गाणे गायले आहे. चैतन्य कुलकर्णी यांनी शब्दबद्ध केलेल्या या गाण्याला एग्नेल रोमन यांनी अप्रतिम संगीत दिले आहे.  ऋता दुर्गुळे आणि शुभंकर तावडे यांच्यावर चित्रीत या गाण्यात प्रेम बहारताना  दिसत आहे. 


या चित्रपटात ऋता दुर्गुळे आणि अजिंक्य राऊत यांच्यासह शुभंकर तावडे, वल्लरी विराज आणि ऋषी मनोहर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. मैत्री, प्रेम आणि स्वप्नं यांना जोडून ठेवणाऱ्या 'कन्नी' चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन समीर जोशी यांनी केले असून अमित भरगड, गगन मेश्राम, वैभव भोर, सनी राजानी,चित्रपटाचे निर्माते आहेत. या गाण्याबद्दल दिग्दर्शक समीर जोशी म्हणतात, " 'कधी कशी' या गाण्यात ऋता आणि शुभंकर या दोघांचे रोमँटिक क्षण दाखवण्यात आले आहेत. हळूवार अशा या गाण्याचे बोलही मनाला स्पर्शून जाणारे आहेत. या चित्रपटातील प्रत्येक गाण्याचा बाज वेगळा आहे.’’


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


मैत्री, प्रेम आणि स्वप्नं यांना एकत्र बांधून ठेवणारा चित्रपट म्हणजे 'कन्नी'. प्रेक्षक 'कन्नी’ची आतुरतेने वाट पाहात असतानाच आता ‘कन्नी’मधील गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. याआधी या सिनेमाचा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित झाला होता. ट्रेलरमध्ये ऋताचे परदेशात स्थायिक होण्याचे स्वप्न आहे, मात्र यात अनेक तांत्रिक अडचणी येत आहेत. आता या अडचणीतून ऋता कशी बाहेर पडणार, तिला तिचा नवरोबा मिळणार आणि यात तिला तिचे मित्र साथ देणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे चित्रपट पाहिल्यावर मिळणार आहेत. सध्या मात्र या सिनेमाची जोरदार चर्चा होताना पाहायला मिळत आहे.