कमला मिल आग प्रकरणात पहिल्या आरोपीला जामीन
कमला मिल कम्पाऊंड प्रकरणातील पहिला विशाल कारिया याला आज जामीन मंजूर झाला आहे. विशाल कारियावर फरार पब्स मालकांना आश्रय दिल्याचा आरोप आहे. फरार पब्स मालकांच्या गाड्या कारियाच्या घराबाहेर सापडल्या होत्या.
मुंबई : कमला मिल कम्पाऊंड प्रकरणातील पहिला विशाल कारिया याला आज जामीन मंजूर झाला आहे. विशाल कारियावर फरार पब्स मालकांना आश्रय दिल्याचा आरोप आहे. फरार पब्स मालकांच्या गाड्या कारियाच्या घराबाहेर सापडल्या होत्या.
कारियाची पार्श्वभूमी वादग्रस्त
ना.म.जोशी मार्ग पोलिसांनी 9 जानेवारीला कारियाला अटक केली होती. कारियाची पार्श्वभूमी वादग्रस्त असल्याचं सांगण्यात येत आहे. क्रिकेट बुकींशी संपर्क असल्याचा आरोप कारियावर होत आहे.
उच्च न्यायालयात जामिनासाठी धाव
क्रिकेट बुकींशी आलेल्या संपर्कबाबत क्राईम ब्रँचची स्पेशल टीम कारियाची चौकशी करत होती.कारियाला 17 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली होती.
पण कारियाने आज उच्च न्यायालयात जामिनासाठी धाव घेतली होती.
लावण्यात आलेल्या कलमामध्ये जामीन शक्य
न्यायालयानं निरीक्षण नोंदवले की, प्रत्यक्ष आगीच्या दुर्घटनेत कारियाचा प्रत्यक्ष सहभाग नाही, ना कारिया त्या पब्सचा मालक किंवा भागीदार आहे. आरोपीना आश्रय दिल्याचा त्याच्यावर आरोप आहे आणि त्याच्यावर लावण्यात आलेल्या कलमामध्ये जामीन मिळू शकतो.