मुंबई : अभिनेत्री कंगना रणौतच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. एकीकडे कंगनाने शिवसेनेवर टीका करणं सुरु केलं आहे तर दुसरीकडे भाजप महाराष्ट्रातील महाविकासआघाडी सरकारला सतत घेरण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान, मुंबई पोलीस कंगनाच्या ड्रग्ज कनेक्शनबाबत चौकशी सुरू करणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज (शनिवार) पासून कंगनाविरोधात ड्रग्ज कनेक्शनच्या संदर्भात चौकशी सुरू होण्याची शक्यता आहे. मुंबई पोलिसांना शासकीय पत्र प्राप्त झाले असून त्यामध्ये तपासाचे आदेश देण्यात आले आहेत. २०१६ मधील अध्ययन सुमनच्या मुलाखतीचा आधार घेऊन हा तपास केला जाणार आहे. मुलाखतीत कंगनाने कोकेन घेतल्याचं त्याने म्हटलं होतं.


शुक्रवारी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कंगनाच्या ड्रग्ज प्रकरणात प्रश्न उपस्थित केला. कंगनाचा एक्स बॉयफ्रेंड अध्ययन सुमनच्या जुन्या मुलाखतीच्या आधारे हे प्रकरण हाताळलं जाणार आहे. अध्ययन सुमनने दावा केला होता की, कंगनाने ड्रग्स घेतले होते आणि त्याला देखील ड्रग्स घेण्यासाठी भाग पाडले होते.


कंगनाचे ट्विट


कंगनाने ड्रग्स कनेक्शनच्या आरोपाबद्दल ट्विट करत म्हटलं की, 'आरोप करण्यापूर्वी माझी ड्रग टेस्ट करुन घ्या, माझे कॉल रेकॉर्ड तपासा, जर ड्रग्स पेडलर्ससोबत तुम्हाला काही कनेक्शन आढळले तर मी माझी चूक स्वीकारून कायमची मुंबई सोडेल. तुम्हाला भेटण्यासाठी उत्सूक आहे.'


दुसरीकडे, कंगनाच्या ड्रग्स प्रकरणात सुमनने आपले नाव घेण्याबाबत आक्षेप घेतला आहे. '२०१६ मध्ये मी एक मुलाखत दिली होती, त्यामुळे आज मी या वादात पुन्हा ओढण्याचा प्रयत्न होत आहे. कृपया मला या प्रकरणात खेचण्याचा प्रयत्न करु नका.'