मुंबई : महाराष्ट्र राज्यातील (Maharashtra) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सरकारविरोधात टीकास्त्र सोडण्याचीची मोहीम राबविणाऱ्या कंगना रनौत (Kangana Ranaut) हिला न्यायालयाने जोरदार झटका दिला आहे. सदनिकांचे (फ्लॅट) अनधिकृत बांधकाम थांबविण्यासाठीची कंगनाची याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. न्यायालयाने म्हटले आहे की, कंगनाने नियमांचे उल्लंघन करत तीन फ्लॅट एकत्र केले आहे.


'कंगनाचे परवानगीशिवाय तीन फ्लॅट्स एकत्र'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उपनगर दिंडोशी येथील खटल्याची सुनावणीच्यावेळी न्यायाधीश एल. एस.चव्हाण यांनी आदेशात म्हटले आहे की, “खार परिसरातील 16 मजली इमारतीच्या पाचव्या मजल्यावर कंगना रनौत (Kangana Ranaut) हिने आपले तीन फ्लॅट एकत्रित करताना नियोजित आराखड्यातील बांधकाम काढले आहे. त्यामुळे अन्य क्षेत्रही त्यात समाविष्ट केले. हे मंजूर योजनेचे गंभीर उल्लंघन आहे, ज्यास सक्षम प्राधिकरणाची मंजुरी आवश्यक आहे.'


कंगना रनौत हिला बसला झटका 


त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकेला अनधिकृत बांधकाम पाडण्यापासून रोखण्यासाठी केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली. न्यायालयाच्या या आदेशामुळे अभिनेत्री कंगना रनौत हिला मोठा झटका बसला आहे. मार्च 2018 मध्ये, बृहन्मुंबई महानगरपालिकीने (BMC) तिच्या खार फ्लॅटमध्ये अनधिकृत बांधकाम कामासाठी अभिनेत्रीला नोटीस बजावली. पण त्यानंतर ही बाब मागे पडली होती.


BMC टीमने कंगनाचे कार्यालय तोडले 


दरम्यान, यापूर्वी बीएमसीच्या पथकाने अनधिकृत बांधकाम केल्याच्या आरोपावरून कंगना रनौत हिच्या कार्यालयाची तोडफोड केली होती. त्या विरोधात कंगना रनौत हिने मुंबई उच्च न्यायालयात अपील केले. तोडफोडी चुकीची असल्याचे सांगत मुंबई उच्च न्यायालयाने बृहन्मुंबई महानगरपालिकेला (BMC) फटकारले होते.