कराड : घरगुती वादातुन मुलाने आपल्या आई आणि पत्नीवर जीवघेणा हल्ला केलाय. जमिनिच्या वादातून हा हल्ल्ला झाल्याची स्थानिकांमध्ये चर्चा आहे. उंब्रज पोलिसांकडुन याप्रकरणी तपास सुरु आहे. आई आणि पत्नीवर हल्ला करुन मुलाने स्वताही आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहेत. या हल्यात  पत्नीचा मृत्यू झालाय. मोहिनी सागर घोरपडे 35 असे मृत पत्नीचे नाव आहे. वराडे तालुका कराड येथे ही घटना घडली आहे. 


जखमींवर उपचार 


आई व  हल्लेखोर मुलगा गंभीर  जखमी झाले आहेत. जखमीवर कराडच्या कृष्णा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सागर सदाशिव घोरपडे (वय 37) आणि कल्पना सदाशिव घोरपडे  (वय 55) अशी जखमींची नावे आहेत.