मुंबई: बेळगावच्या मतगुत्ती गावातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कर्नाटक सरकारने हटवल्यानंतर सुरु झालेले राजकारण आता चांगलेच तापले आहे. या घटनेनंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपवर आगपाखड केली होती. तसेच कर्नाटकात भाजपचे सरकार असताना राज्यातील विरोधी पक्ष गप्प का बसला आहे, असा सवालही शिवसेना नेते संजय राऊत यांनी उपस्थित केला होता. या टीकेला भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिले. त्यांनी म्हटले की, छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कर्नाटकातील मनगुत्ती येथे रातोरात हटवल्याच्या घटनेचा आम्ही जाहीर निषेधच करतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपचे शिवाजी महाराजांबद्दलचे प्रेम हे फक्त मतांपुरतचे - जयंत पाटील

मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा हटवण्यासाठी स्थानिक काँग्रेस आमदार सतिश जारकीहोळी यांचा दबाव कारणीभूत असल्याचा दावा शेलार यांनी केला. त्यामुळे आता शिवसेना कर्नाटकात जाऊन काँग्रेसच्या स्थानिक आमदाराविरोधात आंदोलन करणार का, असा सवाल आशिष शेलार यांनी उपस्थित केला. 


'महाराजांचा पुतळा रात्रीत हटवणाऱ्या कर्नाटक सरकारचा धिक्कार'

तसेच बेळगावात आम्ही विरोधी पक्ष नेत्यांसोबत आंदोलन करायला तयार आहोत. त्यामुळे ते येणार का?, अशी खोचक टिप्पणी करणाऱ्या संजय राऊत यांच्यावरही शेलार यांनी पलटवार केला. छत्रपतींसाठी आंदोलन करायचे झाल्यास त्यासाठी शिवसेनेला विरोधी पक्षनेता आणि भाजपच्या परवानगीची गरज का लागते, असा सवालही शेलार यांनी विचारला. तसेच शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा त्याची जागी बसवला जावा, अशी मागणीही आशिष शेलार यांनी केली.