मुंबई : कोटक महिंद्रा बॅंकने कठुआ गॅंगरेप पीडित मुलीवर सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या आपल्या कर्मचाऱ्याला नोकरीवरुन काढून टाकलेय. बॅंकने स्पष्ट केले आहे की, कर्मचारी विष्णू नंदूकुमार याला नोकरीवरुन  काढून टाकण्यात आलेय. ८ वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार होतो. ही सर्वात दु:खत घटना आहे. या घटनेचा सर्वांना त्रास होत आहे. असे असताना अशा घटनांवर कमेंट करणे योग्य नव्हे. ही शरमेची बाब आहे. कोणताही कर्मचारी असो त्याने सोशल मीडियावर अशी वादग्रस्त कमेंट करणे योग्य नाही. तो बॅंकेचा कर्मचारी असला म्हणून काय झाले, असे कोटक बॅंकेचे प्रवक्ते रोहित राव यांनी म्हटलेय. नंदूकुमारने खराब कामगिरी केलेय, त्यामुळे ११ एप्रिल रोजी त्याला नोकरीवरुन काढून टाकले, असे ते म्हणालेत


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आठ वर्षीय बलात्कार पीडित मुलीची हत्या कथित योग्य असल्याचे म्हटलेय. ती पुढे मोठी होऊन दहशतवादी होऊ शकते. तिला आताच मारणे योग्य आहे. कारण पुढे ती भारताविरुद्ध मानवी बॉम्ब म्हणून काम करु शकते, अशी वादग्रस्त कमेंट सोशम मीडियावर पोस्ट केली होती.



काय आहे हे प्रकरण


जम्मू-काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यातील घटना. १० जानेवारी रोजी कठुआ बकरवाल समुदायाची एक आठ वर्षीय मुलगी बेपत्ता झाली होती. ती बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली होती. पोलीस तक्रारीत म्हटलेय, आरोपीने घोडे शोधण्यासाठी मदत करण्याच्या बहाणाच्या मुलीचे अपहरण केले. या मुलीला देवळात बांधून ठेवण्यात आले. तिला बेशुद्ध करण्यासाठी औषध पाजण्यात आले. १७ जानेवारीला एका झुडपात तिचा मृतदेह सापडला. त्यानंतर शवविच्छेदन केल्यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले. मुलीचे अपहरण करुन तिची हत्या केल्याप्रकरणी आरोपी सांजी रामसह ८ लोकांना पोलिसांनी अटक केली आहे.


अधिक वाचा - उन्नाव गँगरेप प्रकरण : आरोपी भाजप आमदार कुलदीप सेंगरला अटक


या प्रकरणा मागे संशय, पोलीसही सहभागी


आरोपपत्रात खुलासा करण्यात आला आहे की, बकरवाल समाजातील मुलीचे अपहरण, बलात्कार आणि खून हा अल्पसंख्याक समाजातील लोकांना हाकलवून लावण्याची योजना आहे. कठुआस्थित रासना गावातील देवस्थान, मंदिराचा सेवादारचे अपहरण, बलात्कार आणि हत्या याच्या मागे हे मुख्य षडयंत्र आहे. सांझी रामच्या बरोबर विशेष पोलिस अधिकारी दीपक खजुरिया आणि सुरेंद्र वर्मा, मित्र परवेशकुमार ऊर्फ ​​मन्नू, रामचा भाचा किशोर आणि त्यांचा मुलगा विशाल जंगोत्रा ​​ऊर्फ ​​शम्मा हे कथितरित्या सहभागी होते. चार्जशीटमध्ये तपास अधिकारी (आयओ) हेड कॉन्स्टेबल तिलक राज आणि उपनिरीक्षक आनंद दत्त यांचेही नाव पुढे आले आहे. त्यांनी राम यांना चार लाख रुपये आणि महत्त्वपूर्ण पुरावे नष्ट केले आहेत.