Khichdi scam case : मुंबई महापालिकेच्या कथित खिचडी घोटाळा प्रकरणात ईडीने सूरज चव्हाणला  (Suraj Chavan) अटक केली आहे. सूरज चव्हाण हे ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचे निकटवर्तीय मानले जातात. याप्रकरणात ईडीकडून (ED) सूरज चव्हाणची चौकशीही झाली होती. ठाकरे गटाच्या आणखी एका नेत्याला अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबई महानगरपालिकेतील कथित खिचडी घोटाळा प्रकरणात (Kichadi Scam) मुंबई आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय आहे खिचडी घोटाळा?
कोरोना काळात मुंबई महापालिकेचा (BMC) बॉडी बॅग घोटाळ्याची चौकशी सुरु असतानाच खिचडी घोटाळ्याचा आरोप करण्यात आला. कोरोना काळात मुंबईत ज्यांचं स्वत:चं घर नाहीए अशा गरीब मायग्रेन कामगारांसाठी जेवणाची व्यवस्था करण्याचा निर्णय तत्कालीन राज्य सरकारने घेतला होता. खिचडी बनवण्याच कॉन्ट्रॅक्ट मुंबई महापालिकेने 52 कंपन्यांना दिलं होतं. पहिल्या 4 महिन्यात 4 कोटी खिचडी पॅकेट वाटण्यात आल्याचं मुंबई मनपाने सांगितलं.पण यात घोटाळा करण्यात आल्याचा आरोप मुंबई मनपावर करण्यात आला. याचीच चौकशी सुरु आहे. 


सूरज चव्हाण यांच्या खात्यात 37 लाख रुपये जमा झाल्यानंतर त्यांची चौकशी करण्यात आली होती.