`रियानंतर पुढची अटक कोणाला? ठाकरे परिवार आणि सरकारला भीती`
सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) ने रिया चक्रवर्तीला अटक केली आहे.
मुंबई : सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) ने रिया चक्रवर्तीला अटक केली आहे. ड्रग पेडलरशी संबंध असल्यामुळे रिया चक्रवर्तीवर कारवाई करण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून रिया चक्रवर्तीची कसून चौकशी सुरू होती, अखेर आज तिला अटक करण्यात आली.
रिया चक्रवर्तीच्या अटकेनंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. 'रियाला अटक झाली आहे, आता पुढची चौकशी आणि अटक कोणाची होणार? याची भीती ठाकरे परिवार आणि सरकारला वाटत असेल,' असं किरीट सोमय्या म्हणाले आहेत.
'ठाकरे सरकारने ६० दिवस हे प्रकरण दाबून ठेवलं. सीबीआयने फक्त २ आठवड्यात करून दाखवलं. गृहमंत्री अनिल देशमुख यांची ताबडतोब मंत्रिमंडळातून हकालपट्टी व्हायला हवी. तसंच मुंबई पोलीस आयुक्तांची घरवापसी झाली पाहिजे,' अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे.