मुंबई : गेल्या वर्षी कोरोना संसर्गामुळे  लावण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर सोन्याच्या किंमती गगनाला भिडल्या होत्या. ऑगस्टपर्यंत सोन्याचे दर प्रतितोळा 55 हजाराच्या पुढे गेले होते. मार्च महिन्यांपासून कोरोनाची दुसरी लाट देशात थैमान घालत आहे. अनेक राज्यांमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध कडक करण्यात आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या किंमतीतही वाढ दिसून येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फेंब्रुवारी मार्च महिन्याच्या दरम्यान सोन्याच्या किंमती 43 हजार 700 पर्यंत घसरल्या होत्या. परंतु कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रभावामुळे आणि बाजारातील चढउतारामुळे सोन्याचे भाव पुन्हा वाढत आहे. आज मुंबईतील सोन्याचे दर 48 हजार 840 रुपये प्रतितोळा इतके आहेत.


गुरूवारी सोने 47 हजार 175 रुपये प्रतितोळे होते. 2-3 दिवसात सोन्याच्या दरांमध्ये साधारण 1500 रुपये प्रतितोळा इतकी वाढ झाली आहे.