वाकून पाया पडण्याचे वैज्ञानिक कारणं तुम्हाला माहित आहेत का?
वाकून पाया पाडणं ही फक्त एक परंपरा नाही तर स्वतःमध्ये एक विज्ञान आहे. या विज्ञानात फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या तिन्ही गोष्टी सामावलेल्या आहेत.
मुंबई : वाकून पाया पाडणं ही फक्त एक परंपरा नाही तर स्वतःमध्ये एक विज्ञान आहे. या विज्ञानात फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या तिन्ही गोष्टी सामावलेल्या आहेत.
पाय पडण्यासाठी आपण पुढच्या बाजूला झुकतो. आणि आपल्या दोन्ही हाथाने पाया पडतो. किंवा उजवा हात आणि उजवा पाय पुढे करून पाया पडल्या जातात. या प्रक्रियेत आपण ऊर्जा चक्र पूर्ण करत असतो. विज्ञानानुसार, आपल्या शरिरात डोक्याकडून ऊर्जेचा प्रवेश होऊन पायाकडे याचा प्रवाह जातो.
विज्ञानात डोक्याला उत्तरी ध्रुव आणि पायाला क्षिणी ध्रव असं मानलं जातं. जेव्हा आपण मोठ्यांचे पायाला स्पर्श करते तेव्हा विज्ञानानुसार चुम्बकीय ऊर्जाचा चक्र पूर्ण केला जातो. गुरूत्वाकर्षणाच्या नियमानुसार शरीरातील दक्षिण ध्रुव म्हणजे पायात ऊर्जा केंद्र तयार होतं. पाया पडल्यानंतर ऊर्जेसोबतच अथाह भंडार देखील प्राप्त होतो. यासाठी कायम आई, गुरू आणि आदरणीय व्यक्तिंच्या पाया पडण्यासाठी सांगितलं जातं. यामुळे आपल्या शरिरात सकारातम्क ऊर्जा निर्माण होते.
पाया पडण्यामागील विज्ञान हे आहे की पाया पडून आपण दुसऱ्यांप्रती आदर भाव व्यक्त करतो. यामुळे आपल्यातील विनम्रता अधिक वाढते. आपण ज्या व्यक्तीच्या पाया पडतो तो व्यक्ती आशिर्वाद देण्यासाठी आपल्या डोक्यावर हात ठेवतो. आणि हाच स्पर्श आपल्याला सुरक्षित असल्याची जाणीव देतात. धार्मिक आचरणाच्या आधारावर बघायला गेलं तर मोठ्यांच्या पाया पडल्यामुळे आपल्याला दररोज सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. ज्याला आयुवृद्धिचे कारण समजले जाते.
पाया पडण्यासाठी वाकावे लागते, बसून पाया पडणे स्वतःमध्येच एक व्यायाम केल्यासारखं आहे. असं केल्यामुळे शरीर सक्रिय होतं. आणि बॉडीमध्ये ब्लड सर्क्युलेशन वाढत जाते. मस्तिष्कमध्ये शरीर संचालित होतं. पुढे झुकण्यासाठी डोक्याची नस रक्तातील संचार वाढत असते. आणि आपण फ्रेश राहतो. याच कारणामुळे पाया पडल्यामुळे चरण स्पर्शाला धर्म आणि आचरणाची जोड दिली जाते.