नवी दिल्ली : गेल्या कित्येक दिवसांपासून सोन्या-चांदीच्या किंमतीत चढ-उतार सुरु आहेत. दिल्ली सराफा बाजारात आज १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा भाव ३७ हजार ४१० रुपये इतका आहे. तर १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा भाव ३८ हजार ६१० रुपये आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आंतरराष्ट्रीय बाजारात रुपयाच्या किंमतीचा परिणाम सोन्यावरही झाल्याचं पाहायला मिळतंय. मुंबईत आज २२ कॅरेटच्या १० ग्रॅम सोन्याचा भाव ३७ हजार ५३० रुपये आहे. तर २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा दर ३८ हजार ५३० रुपये इतका आहे. 


आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीचे दर वाढले आहेत. दिल्लीसह मुंबईतही एक किलो चांदीचा दर ४८ हजार ९५० रुपये इतका आहे. 


 आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीत घसरण झाल्याने, देशांतर्गत बाजारातही सोन्याचे दर कमी झाले आहेत. 


  


तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, सोन्याच्या किंमतीतील घसरण आता थांबू शकते. कारण, 'मूडीज'ने भारताचा आउटलुक कमी केल्यानंतर, अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयांत कमी आली आहे. याचा परिणाम सोन्याच्या दरावर होण्याची शक्यता आहे.