मुंबई : पंचागानुसार कृष्ण जन्माष्टमी भाद्रपद मासातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी आहे. पौराणेतील कथेनुसार, भगवान श्रीकृष्णाचा जन्म हा भाद्रपद मासमधील अष्टमी तिथीला रोहिणी नक्षत्राला झाला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंचागानुसार अष्टमीची तिथी ११ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजून ६ मिनिटांनी सुरू झाली आहे. अष्टमीची तिथी १२ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजून १६ मिनिटांनी संपणार आहे. ११ ऑगस्ट रोजी भरणी आणि १२ ऑगस्ट रोजी कृतिका नक्षत्र आहे. यानंतर रोहिणी नक्षत्र येत असून १३ ऑगस्ट रोजी असणार आहे. 


काय आहे शुभ मुहूर्त? 


जन्माष्टमीच्या दिवशी सकाळी किंवा रात्री पूजा करण्याची वेळ योग्य आहे. भगवान कृष्णाचा जन्म हा मध्यरात्री झाला होता. १२ ऑगस्ट रोजी पूजेची शुभवेळ १२ वाजून ५ मिनिटांपासून ते १२ वाजून ४७ मिनिटांपर्यंत आहे. पूजेच्या विधीचा काळ ४३ मिनिटं असणार आहे. 



मथुरा आणि द्वारकेत जन्माष्टमी १२ ऑगस्ट रोजी साजरी केली जाणार आहे. १२ ऑगस्ट जन्माष्टमी पर्व साजरा केला जातो. यावर्षी ४३ मिनिटांचा पूजेचा कालावधी आहे. रात्री १२ वाजून ५ मिनिट ते १२ वाजून ४७ मिनिट असा शुभ मुहूर्त पूजेकरता असणार आहे. या मुहूर्तावर श्रीकृष्णाची पूजा केली जाणार आहे.