COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई :  कर्नाटक विधानसभेत जोरदार धोबीपछाड देत काँग्रेस आणि जेडीएसने भाजपला रोखले. त्यामुळे भाजपचे येडियुरप्पा अवघे दीड दिवसांचे मुख्यमंत्री ठरले. त्यानंतर आता काँग्रेस आणि जेडीएसच्यावतीने, कुमारस्वामी हे कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून सरकार स्थापन करत आहेत. त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी आज (बुधवार, २३ मे) पार पडत आहे. दरम्यान, या शपथविधीला काँग्रेस, जेडीएस जोरदार शक्तिप्रदर्शन करत आहेत, भाजपच्या विरोधातील सर्वपक्षीय नेत्यांना शपथविधीसाठी बोलत आहे. हाच धागा पकडून जनता दल सेक्युलरचे (जेडीएस) नेते कुमारस्वामी यांच्याकडून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कर्नाटक मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्याचं आमंत्रण देण्यात आले आहे. मात्र, या शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण स्वीकारून उद्धव ठाकरे उपस्थित राहणार का? याबाबत उत्सुकता आहे.


दरम्यान, दोन दिवसांपूर्वी कुमारस्वामींनी आणि उद्धव ठाकरेंशी दूरध्वनीवर चर्चा केली. उद्धव ठाकरेंनी कुमारस्वामींना शुभेच्छा दिल्या.  पण पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारामुळे शपथविधीला उपस्थित न राहू शकत असल्याचे, त्यांनी कुमारस्वामी यांना सांगितल्याचं समजतंय.


ठळक मुद्दे


  • जनता दल सेक्युलरचे नेते कुमारस्वामी यांच्याकडून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कर्नाटक मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्याचं आमंत्रण.

  • कुमारस्वामी आणि उद्धव यांच्यात दूरध्वनीवर चर्चा.

  • उद्धव यांनी दिल्या कुमारस्वामी यांना शुभेच्छा, पण पालघर लोकसभा पोटननिवडणुकीच्या प्रचारामुळे शपथविधीला उपस्थित न राहू शकत असल्याचं सांगितल्याची सूत्रांची माहिती.