मुंबई : कुर्ला स्थानकाबाहेर एक धक्कादायक घटना समोर येत आहे.  दोन बसच्या विचित्र अपघातात एक महिलेला आपला प्राण गमवावा लागला आहे. बसचालक बस मागे घेत असताना ही दुर्घटना घडली. दोन बसमध्ये दबून पादचारी महिलेचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी बस चालकाला ताब्यात घेण्यात आलंय.


बस चालक ताब्यात 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोन बसमध्ये अडकल्याने महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी पोलिसांनी याबाबत बेस्ट चालकाला ताब्यात घेतलंय.


प्रशासनावरही प्रश्नचिन्ह


कुर्ला स्थानकाबाहेर अनधिकृत पार्किंग, फेरिवाल्यांचा प्रश्न ऐरणीवर आहे. यामुळे स्थानक परिसरात मोठी गर्दी होत असते. याच्यावेळोवेळी तक्रारीही केल्या जातात. पण अनधिकृत फेरिवाले आणि पार्किंगवर काही कारवाई होताना दिसत नाही. पण दुर्देवी घटनांमुळे हे प्रश्न ऐरणीवर आला आहे.