मुंबई आणि ठाण्यात दुधाचा तुटवडा
लोकांना वेठीस धरु नका- ग्राहकांची मागणी
मुंबई : मुंबईतल्या अनेक दूध डेअऱ्यांवर आज पश्चिम महाराष्ट्रातून येणारं दूध पोहचलेलं नाही. गोकूळ, अमूल, महानंद आणि वारणाचं दूध मिळत नाही आहे. नेहमीपेक्षा आवक घटल्यानं तरी दूधाचा तुटवडा जाणावण्याची शक्यता आहे. मुंबईत ब्रँडेड दुधाचा तुटवडा जाणवतो आहे. आता सुट्ट्या दुधावर मुंबईची भिस्त आहे.
आज आंदोलनाच्या चौथ्या दिवशी ठाण्यात दूधाचा तुटवडा जाणावायला सुरूवात झाली आहे. गोकुळचं 50% दूध कमी आल्यानं ठाण्यात दुधाचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्याचा ताण बाकीच्या दुधाचा व्रिक्रीवर झाला आहे. रोज 1 लीटर घेणारे ग्राहक जास्त दूध विकत घेत आहेत. तर आम्ही या आंदोलनाला पाठिंबा देतो परंतू यामध्ये लोकांना वेठीस धरू नये असे ठाणेकर ग्राहक सांगत आहेत.