मुंबई : लालबागच्या बाजारात दाटीवाटीत लालबागचा राजा विराजमान होत असला तरीही जगभरातून गणेशोत्सवाच्या काळात भाविक त्याच्या भेटीला येतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रत्येकजण आपल्या कुवतीनुसार, इच्छेनुसार काही दान देतात. त्यांचे नवस फेडतात. 


यंदाही नारळाच्या तोरणांपासून सोन्या-चांदीच्या वस्तूंच्या रूपात अनेक गोष्टी लालबागच्या राजाला अर्पण करण्यात आला. त्यापैकी एका भाविकाने  किलोभर वजनाची सोन्याची वीट लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केली आहे. या वीटेची किंमत सुमारे ५ कोटी आहे. 


२२ तासांच्या विसर्जन मिरवणूकीनंतर थाटात लालबागच्या राजाचे गिरगाव चौपटीवर बुधवारी सकाळी विसर्जन झाले. विसर्जनानंतर राजाच्या चरणी काय-काय अर्पण करण्यात आले आहे याबाबतची माहिती मंडळाकडून देण्यात आली आहे.


भाविकांनी अर्पण केलेल्या गोष्टींमध्ये सोन्याची वीट, सोन्याची लक्ष्मीची मूर्ती, गणेशमूर्ती, २५० ग्रॅम वजनाचा सोन्याचा मोदक यासह अनेक सोन्या, चांदीचे दागिने व ५ कोटीची रोख रक्कम जमा झाली आहे. गेल्यावर्षी सुमारे ६ कोटी ६ लाख रुपये रोख व २ कोटी २० लाख रुपयांच्या वस्तूंचा लिलाव असे सुमारे ९ कोटी रूपये मंडळाकडे जमा झाले होते. यंदाच्या वर्षीचा लिलाव येत्या शनिवारी होणार असल्याची माहितीही या वेळेस देण्यात आली आहे