नवी दिल्ली : महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. परंतु पहिल्यांदाच 'दाढी' प्रथमच  महिलांकडून करुन घेतली. नेहा आणि ज्योतीसाठी हा अभिमानाचा क्षण असेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतात रुढी परंपरेला आजही प्राधान्य दिले जात आहे. तसेच महिला पुरुष विषमता कायम आहे. या रुढी परंपरेला छेद देण्यासाठी सचिन तेंडुलकरने हे पाऊल उचले आणि आपले योगदान दिले आहे. सलून व्यवसायत पुरुष वर्गाचे वर्चस्व आहे. हे वर्चस्व मोडण्यासाठी तेंडुलकरने महिलांकडून दाढी करुन घेतली. उत्तर प्रदेशच्या बनवारी टोला गावातील नेहा आणि ज्योती यांनी वडील आजारी पडल्यानंतर २०१४ मध्ये वडीलांची जबाबदारी उचलण्याचा निर्णय घेतला. जरी या दोघींनी सलून व्यवसायात पाऊल टाकले तरी त्यांच्यासाठी ही गोष्ट सहजशक्य नव्हती. कारण सुरुवातील महिलांकडून दाढी करुन घेण्यासाठी पुरुष येत नव्हते. तसेच केस कापण्यासाठी येत नव्हते. त्यामुळे पुढे काय करायचे हा प्रश्न होता? 



जिलेट इंडियाच्या जाहिरातीमध्ये त्यांची प्रेरणादायी कथा पुढे आली. त्यानंतर अनेक लोकांनी याला पसंती दिली. या जाहिरातीला चांगल्या हिट्स मिळत आहेत. लोक आवडीने ही जाहिरात पाहात आहेत. या जाहिरातीला YouTube वर १.६ कोटी लोकांनी पाहिले आहे. यामध्ये सचिन तेंडुलकरने दोन मुलींकडून दाढी करुन घेत आहे.


तेंडुलकरने याबाबत Instagram वर पोस्ट केले. त्यांनी लिहिले, "कदाचित आपल्याला ते माहित नाही, परंतु मी कधीही कोणाकडून दाढी केलेली नाही. आज हा रेकॉर्ड तोडला गेला. या सलूनवाल्या महिलांना भेटल्यानंतर मला ही सन्मानाची बाब वाटत आहे.



सचिन तेंडुलकरने या दोघींना जिलेट शिष्यवृत्ती देखील प्रदान केली आहे. त्यामुळे त्यांना शैक्षणिक आणि व्यावसायिक गरजा पूर्ण करण्यासाठी याची मदत होणार आहे.