Mumbai : देशातील बडे उद्योगपती मुकेश अंबानी ( Mukesh Ambani )  पुन्हा एकदा निशाण्यावर असल्याचं समजतंय. रिलायन्स इंडस्ट्रीज चे प्रमुख मुकेश अंबानी यांना पुन्हा एकदा धमकी ( Threat call to Mukesh Ambani )  देण्यात आली आहे. ठाण्यातील रिलायन्स हॉस्पिटल उडवून देऊ अशी धमकी मुकेश अंबानी यांना देण्यात आली आहे. समोर येणाऱ्या माहितीनुसार एका अज्ञात नंबरवरून हा धमकीचा फोन आला आहे. दरम्यान याप्रकरणी पोलिसांमध्ये गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


परिमंडळ २ अंतर्गत डी बी मार्ग पोलीस ठाणे हद्दीतील रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलच्या नंबरवर एका अनोळखी नंबरवरून धमकी देणारा कॉल आला होता. सदर धमकी देणाऱ्या व्यक्तीने रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटल उडवून देण्याची तसेच अंबानी कुटुंबियांच्या संदर्भात धमकी दिलेली होती. धमकीच्या अनुषंगाने डॉ. डी बी मार्ग पोलिस ठाणेस गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून सदर प्रकरणी मुंबई पोलीस पुढील चौकशी करत आहे.