मुंबई  : गुजरात (Gujrat) राज्यातील जुनागढ इथल्या सक्करबाग उद्यानात (Sakkarbaug Zoological Garden) असलेल्या नर सिंह आणि मादी सिंहांची जोडी (Asiatic lion) मुंबई (Mumbai) इथल्या बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात (Sanjay Gandhi National Park) लवकरच दिसणार आहे. या बदल्यत बोरिवली इथल्या वाघांची जोडी (नर आणि मादी ) जुनागढ (Junagadh) इथं पाठविण्यात येणार आसल्याची माहीती राज्याचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी आज दिली. गुजरातचे वन राज्य मंत्री जगदीश विश्वकर्मा (Jagdish Vishwakarma) आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यात आज अहमदाबाद इथं यासंदर्भात चर्चा झाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या प्रस्तावाबाबत संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवलीकडून प्रधान मुख्य वन संरक्षक (वन्य जीव ) सुनील लिमये (Sunil limaye) आणि जुनागढ सक्करबाग उद्यानाचे संचालक अभिषेक कुमार यांच्यात यासंदर्भात चर्चा झाली होती.  4 एप्रिल  2022 रोजी अप्पर प्रधान मुख्य वन संरक्षक डॉ क्लेमन्ट बेन आणि  संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवलीचे संचालक जी मल्लिकर्जुन यांनी प्रधान मुख्य वन संरक्षक सुनील लिमये यांच्या निर्देशानुसार गुजरातचे प्रधान मुख्य वनसंरक्षक यांच्याशी चर्चा केली तसंच कार्यवाही सुरू केली होती.


त्यावर सुधीर मुनगंटीवार आणि गुजरातचे राज्यमंत्री विश्वकर्मा यांनी आज विस्तृत चर्चा केली. केंद्रीय  प्राणीसंग्रहालय प्राधिकरण यांच्याकडून या प्रस्तावास  मान्यता मिळविण्यासाठी एकत्र प्रयत्न करण्याचे यावेळी ठरलं.