Loksabha Election 2024 : मविआचं ठरलं आणि बिनसलं! `या` 3 जागांच्या वादामुळे ठाकरे गटाच्या उमेदवारांची यादी रखडली
Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणूक 2024 साठी ठाकरेंचं ठरलं ठरलं म्हणतांच बिनसलं. 3 जागांच्या वादामुळे ठाकरे गटाच्या उमेदवारांची यादी रखडली.
Loksabha Election 2024 : संजय राऊत यांनी सांगितल्यानुसार मंगळवारी सामनामधून ठाकरेंच्या शिवसेनेची यादी जाहीर होणार होती. पण सोमवारी संध्याकाळी मातोश्रीवर झालेल्या बैठकीत ठाकरेंच्या ठरलेल्या यादीवर तीन जागांवरुन वाद झाला. सांगली, भिवंडी आणि दक्षिण मध्य मुंबईतील जागेवर काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेनंही दावा केलाय. शरद पवारांच्या उपस्थितीत मातोश्रीवर झालेल्या बैठकीतही हा तिढा सुटला नाही. त्यामुळे आता दिल्लीतील काँग्रेसच्या नेत्यांशी संपर्क केला जाणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिलीय. (list of Thackeray group candidates was stalled due to the dispute over 3 seats Sangli Bhiwandi South Central Mumbai Loksabha Election 2024)
काँग्रेसच्या भूमिकेमुळे मिठाचा खडा!
सांगली आणि भिवंडी मतदारसंघावरुन मविआमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसची ताकद मोठी आहे हे सांगत काँग्रेसला सांगली सोडायची नाही आहे. या जागांवरून काँग्रेसने ताठर भूमिका घेतल्यामुळे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केल्याच बोलं जातंय. सांगली लोकसभा मतदार संघातून उबाठा यांना लढायची आहे तर भिवंडी लोकसभा राष्ट्रवादी शरद पवार यांना लढवायची आहे, अशी सूत्रांची माहिती आहे. काँग्रेस आपल्या भूमिकेवर ठाम असताना दुसरीकडे कोणत्याही परिस्थितीत दोन्ही जागा काँग्रेसला न सोडण्याची ठाकरे, पवारांची भूमिकेमुळे जागावाटपाचा तिढा कायम आहे.
महाविकास आघाडीच्या नेत्यांची गेल्या आठवड्यातही सिल्व्हर ओकवर बैठक झाली होती. त्यात बैठकीत सांगलीच्या जागेवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यात खडाजंगी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. या जागेवरुन वाद सुरु असतानाच उद्धव ठाकरे सांगलीत गेले आणि जाहीर सभेत त्यांनी चंद्रहार पाटील यांची उमेदवार म्हणून घोषणा केली. त्यानंतर काँग्रेस अजून तीव्र नाराज झाले. कारण त्यांना सांगलीमधून माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचं नातू विशाल पाटील यांना उमेदवारी द्यायची आहे.
शिवसेनेचे संभाव्य उमेदवार
1) दक्षिण मुंबई – अरविंद सावंत
2) दक्षिण मध्य मुंबई – अनिल देसाई
3) उत्तर पूर्व मुंबई – संजय पाटील
4) उत्तर पश्चि मुंबई – अमोल किर्तीकर
5) उत्तर मुंबई – तेजस्वी घोसाळकर / विनोद घोसाळकर
6) ठाणे – राजन विचारे
7) कल्याण – केदार दिघे
8) पालघर – भारती कामडी किंवा सुधीर ओझरे
9) रायगड - अनंत गिते
10) रत्नागिरी – सिंधुदुर्ग – विनायक राऊत
11) मावळ – संजोग वाघिरे पाटील
12) सांगली – चंद्रहार पाटील
13) नाशिक – विजय करंजकर
14) संभाजीनगर – चंद्रकांत खैरे किंवा अंबादास दानवे
15) परभणी – संजय जाधव
16) हिंगोली – नागेश आष्टीकर
17) धाराशिव – ओमप्रकाश राजेनिंबाळकर
18) बुलढाणा – नरेंद्र खेडेकर
19) यवतमाळ वाशिम – संजय देशमुख
20) शिर्डी – भाऊसाहेब वाकचौरे
21) जळगाव – ललिता पाटील किंवा हर्षल माने
22) हातकणंगले – राजू शेट्टींना पाठिंबा