Mumbai Ganesh Visarjan 2023 : `पुढच्या वर्षी 7 सप्टेंबरला मी येतोय...`; लालबागच्या राजाचं विसर्जन संपन्न

Fri, 29 Sep 2023-9:31 am,

Mumbai Ganesh Visarjan 2023 :`पुढच्या वर्षी 7 सप्टेंबरला मी येतोय...`; लालबागच्या राजाचं विसर्जन संपन्न

Ganesh Visarjan 2023 : दहा दिवसांच्या पाहुणचारानंतर गणपतीबाप्पा आता निरोप घेतला. मुंबईत लालबागचा राजा, गणेशगल्ली मुंबईचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी, तेजुकायाचा राजा अशा गणपती मंडळांच्या मिरवणुकांनी लालबाग परळ परिसर खुलून गेला होता.  तर, शहराच्या इतर भागांमधून येणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्ती गिरगाव चौपाटीच्या दिशेनं मार्गस्थ झाल्या. अतिशय वाजत गाजत गणपती बाप्पा आले आणि अखेर पाहुणचार घेऊन आपल्या गावी गेले. पाहता पाहता आनंदाचे हे दिवस कसे सरले अनेकांनाच कळलं नाही. पण, या उत्सवाची सांगता सर्वांनीच एका आशादायी आश्वासनानं केली. आता ओढ पुढच्या वर्षीच्या गणेशोत्सवाची... गणपती बाप्पा मोरया!!!

Latest Updates

  • Ganesh Visarjan 2023 LIVE: यंदाच्या वर्षीच्या गणेशोत्सवाची सांगताही त्याच उत्साहात झाली. मुंबईत अनेक गणेशोत्सव मंडळांच्या बाप्पांचं विसर्जन शुक्रवारी सकाळी पार पडलं. मानाचा लालबागचा राजाही शुक्रवारी सकाळी 9 वाजून 14 मिनिटांनी विसर्जित झाला. यावेळी कोळी बांधवांनीही आपआपल्या होड्या आणत राजाला निरोप दिला. अतिशय उत्साहात बाप्पा आले आणि पाहुणचार घेऊन त्यांच्या गावाला गेले. आता ओढ पुढच्या वर्षीच्या गणेश चतुर्थीची... गणपती बाप्पा मोरया!!!

     

  • Ganesh Visarjan 2023 LIVE: गिरगाव चौपाटीवर लालबागच्या राजाचं विसर्जन सुरु, कोळी बांधवांची मोठ्या संख्येनं उपस्थिती.

     

  • Ganesh Visarjan 2023 LIVE: मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर एकिकडे इतर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या बाप्पांचं विसर्जन सुरु असतानाच तिथं लालबागच्या राजाचंही अत्याधुनिक तंत्राच्या सहाय्यानं विसर्जन करण्यात येत आहे. 

     

  • Ganesh Visarjan 2023 LIVE: अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारीसुद्धा मोठ्या गणेश मंडळांच्या मूर्तींचं विसर्जन गिरगाव चौपाटीवर सुरुच होतं. लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी, डोंगरीचा राजा, गिरगावचा महाराजा या आणि अशा इतरही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्ती दाखल झाल्या असून, आता त्यांच्या विसर्जनास सुरुवात झाली आहे. 

     

  • लालबागचा राजा ओपेरा हाऊस परिसरापर्यंत पोहोचला असून समुद्राला ओहोटी आल्याने विसर्जनासाठी उशीर होण्याची शक्यता आहे. 

  • लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी गिरगाव चौपाटीवर गणेश भक्तांनी प्रचंड गर्दी

  • लालबागचा राजा व्हीपी रोडवर पोहोचला आहे. थोड्याच वेळात होणार बाप्पाचं विसर्जन

  •  मुंबईतल्या गणपतींचं चौपाट्यांवर विसर्जन सुरू आहे.  गणरायाला निरोप द्यायला मुंबईकरांची गर्दी पहायला मिळत, लालबागचा राजा भायखळ्यात दाखल झाला आहे. 

  • Mumbai Ganesh Visarjan 2023 LIVE: प्रभादेवीतील आदर्श नगरचा वक्रतुंडला साश्रुनयनांनी निरोप

  • Mumbai Ganesh Visarjan 2023 LIVE: 'मुंबईचा राजा' गिरगाव चौपाटीवर दाखल, थोड्याच वेळात होणार विसर्जन 

  • Mumbai Ganesh Visarjan 2023 LIVE: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थोड्याच वेळात गिरगाव चौपाटीवर पोहोचणार, विसर्जन व्यवस्थेचा आढावा घेणार

  • Mumbai Ganesh Visarjan 2023 LIVE: गिरगाव चौपाटीवर वाजत-गाजत बाप्पाचे विसर्जन, अनेक सार्वजनिक मंडळाच्या बाप्पांचे विसर्जन पार पडले

     

  • Mumbai Ganesh Visarjan 2023 LIVE:  गिरगाव चौपाटीवर भाविकांची गर्दी; बाप्पाला वाजत-गाजत निरोप

  • Mumbai Ganesh Visarjan 2023 LIVE:  श्रॉफ बिल्डिंगमधून गणारायावर पुष्पवृष्टी

  • Ganesh Visarjan 2023: तेजुकायाचा गणराय विसर्जनासाठी चौपाटीवर पोहोचला

  • Ganesh Visarjan 2023 LIVE : जुहू समुद्रकिनाऱ्यावर गणेश विसर्जनासाठी तैनात असलेल्या तरुणावर वीज कोसळली

  • Ganesh Visarjan 2023 LIVE : मुंबईचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ, बाप्पावर सुरेख पुष्पवृष्टी

  • तेजुकाया गणराय विसर्जनासाठी मार्गस्थ, मिरवणुकीत भक्तांची अलोट गर्दी

  • बाप्पाच्या विसर्जनाला वरुणराजाची हजेरी, मुंबईतील काही भागांत पावसाला सुरुवात

    अधिक माहितीसाठी या लिंकवर क्लिक करा- पावसात भिजतच करावं लागणार गणेश विसर्जन; पुढील 24 तास महत्वाचे, 'या' भागासाठी हवामान खात्याचा अलर्ट

  • Ganesh Visarjan 2023 LIVE: लालबाग मार्केटमधून लालबागचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ, दर्शनासाठी भक्तांची अलोट गर्दी

  • Ganesh Visarjan 2023 LIVE : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावरील बाप्पाचे भक्तिभावात विसर्जन

  • Ganesh Visarjan 2023 LIVE : लालबाग मार्केट येथील श्रॉफ बिल्डींग पृष्पवृष्टी मंडळाकडून मुंबईचा राजा, तेजुकायाचा राजा या सार्वजनिक बाप्पांवर सुरेख पुष्पवृष्टी. 

  • Ganesh Visarjan 2023 LIVE : उत्सव राजाचा… सोहळा शिवराज्यभिषेकाचा
    लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून लालबाग मुख्य गेटवर छत्रपती शिवाजी महाराजांचा 350 राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त मानाचा मुजरा सादर. 

     

  • Ganesh Visarjan 2023 LIVE : लालबागच्या रस्त्यांवर गुलालाची उधळण. महत्त्वाच्या मंडळांचे गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ; मंडळांमधील मित्रत्वानं जिंकली मनं 

  • Ganesh Visarjan 2023 LIVE: आज दिनांक 28 सप्टेंबर रोजी लालबाग, काळाचौकी परिसरामध्ये अनेक मंडळाचे गणपती विसर्जनाकरिता बाहेर पडणार असून यावेळी त्यांच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जनतेस होणारी गैरसोय टाळण्यासाठी खालील वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे. 

  • Ganesh Visarjan 2023 LIVE: गणेश चतुर्दशी अर्थात गणेश विसर्जनासाठी मुंबईत जय्यत तयारी झाली सुरु झाली आहे. त्याचबरोबर नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस दलानं देखील कबर कसली आहे. यासाठी तब्बल 19000 पोलीस कर्मचारी रस्त्यावर तैनात असणार आहेत. मुंबईचे सहपोलीस आयुक्त सत्या नारायण यांनी सांगितलं आहे.

     

  • Ganesh Visarjan 2023 LIVE : मुंबईच्या रस्त्यारस्त्यांवर गणेश विसर्जन मिरवणुका निघाल्या असून, लालबाग- परळ परिसर भाविकांनी फुलला आहे. 

  • Ganesh Visarjan 2023 LIVE: सुखकर्ता दुखहर्ता... असं म्हणत शंखनादामध्ये लालबागच्या राजाची आरती संपन्न झाली. यावेळी उपस्थित गणेशभक्तांनी साश्रू नयनांनी बाप्पाला आळवत त्याच्यापुढं आपल्या मनातील भाव मांडले. 

     

  • Ganesh Visarjan 2023 LIVE: मुंबईच्या राजाची आरती सुरु, कार्यकत्यांची गर्दी. गणरायापुढे सारे नतमस्तक. 

  • हेसुद्धा वाचा : Ganesh Visarjan Live Blog : पुणे, कोल्हापुरात गणेश विसर्जनाचा सोहळा उत्साहात

  • Ganesh Visarjan 2023 LIVE: लालबाग राजाला स्वरांजली बँड पथक देणार पहिली सलामी. मुख्य दारावर राजाला सलामी. 

     

  • Ganesh Visarjan 2023 LIVE: गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी करण्यात आलेल्या गर्दीमध्ये कोळी बांधवांचीही उपस्थिती पाहायला मिळाली. कोळ्यांचा गणपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लालबागच्या राजाचरणी सलामी देण्यासाठी म्हणून गुरुवारी सकाळपासूनच कोळी बांधवांनी येण्यास सुरुवात केली. 

    हेसुद्धा वाचा : पालखी निघाली राजाची...; लालबागच्या राजापुढं कोळी बांधवांनी पारंपरिक वाद्यांवर धरला ठेका 

     

  • Ganesh Visarjan 2023 LIVE: मुंबईचा राजा गणेशगल्लीतून विसर्जन मार्गावर मार्गस्थ. मंडळातील कार्यकर्ते, स्थानिक रहिवासी आणि असंख्य भक्तगणांच्या साथीनं बाप्पांची मिरवणूक सुरु. ढोलताशा आणि तालवाद्यांचा गजर! 

  • Ganesh Visarjan 2023 LIVE: मुंबईच्या राजाची आरती सुरु झालेली असतानाच तिथं लालबाग परिसरामध्ये कोळी बांधवांनी लालबागच्या राजाच्या मंडपामध्ये पारंपरिक वाद्यांच्या ठेक्यावर ताल धरण्यास सुरुवात केली आहे. 

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

     

  • Ganesh Visarjan 2023 LIVE: मुंबईच्या राजाची आरती सुरु, कार्यकत्यांची गर्दी. गणरायापुढे सारे नतमस्तक. 

  • Ganesh Visarjan 2023 LIVE: मुंबईच्या राजाची आरती सुरु, कार्यकत्यांची गर्दी. गणरायापुढे सारे नतमस्तक. 

  • Ganesh Visarjan 2023 LIVE: मुंबईच्या राजाची आरती सुरु, कार्यकत्यांची गर्दी. गणरायापुढे सारे नतमस्तक. 

  • Ganesh Visarjan 2023 LIVE: Ganesh Visarjan 2023 LIVE: मुंबईतील विसर्जन मिरवणुकांवर प्रशासनाची नजर असणार असून, या मिरवणुकांच्या धर्तीवर काही नियम लागू करण्यात आले आहेत. ज्यामध्ये 13 पुलांवर विसर्जन मिरवणुकांसाठी निर्बंध घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    - मरिन लाइन्स रेल्वे ओव्हर ब्रिज

    - ग्रॅन्ट रोड व चर्नी रोडच्या मधील पूल

    - फ्रेंच रेल्वे ओव्हर ब्रिज (ग्रॅन्ट रोड व चर्नी रोडच्या मध्ये)

    - केनडी पूल (ग्रॅन्ट रोड व चर्नी रोडच्या मध्ये)

  • Ganesh Visarjan 2023 LIVE: (Maharashtra Rain) विसर्जन मिरणुकांमध्ये गर्दीचा जनसागर उसळलेला असतानाच पावसाचीही हजेरी असणार आहे. हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार मुंबईसह पुण्यात आणि कोकणात विसर्जनाच्या दिवशी पावसाची जोरदार हजेरी असणार आहे. मागील चार दिवसांपासून कमीजास्त प्रमाणात सक्रिय असणारा पाऊस पुढील 24 तासांमध्ये आणखी जोर धरताना दिसणार आहे.

     

  • Ganesh Visarjan 2023 LIVE: राजा तेजुकायाचा आणि चिंचपोकळीचा चिंतामणी या गणेशोत्सव मंडळांकडूनही बाप्पांच्या विसर्जन मिरवणुका सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास निघणार असून, तिथून परळमधून नरेपार्क- परळचा राजा, लाल मैदान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, पोस्टगल्लीचा राजा असे बाप्पा गिरगाव चौपाटीच्या दिशेनं मार्गस्थ होणार आहेत. 

  • Ganesh Visarjan 2023 LIVE: गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकांचं थेट प्रक्षेपण... 

  • Ganesh Visarjan 2023 LIVE: लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून बाप्पाची विसर्जन मिरवणूक गणेशगल्लीच्या गणपतीनंतर सुरु होणार असून, सकाळी 10  वाजता लालबागच्या राजाची आरती होणार आहे. तर, त्यानंतर तासाभरानं म्हणजेच सकाळी 11 वाजता लालबागच्या राजाची मिरवणुक शाही थाटात लालबाग मार्केटमधून निघणार आहे. यावेळी कोळी बांधवांसह भक्तांचा जनसागर लोटल्याचं पाहायला मिळेल. शुक्रवारी सकाळी 6 वाजता गिरगाव चौपाटीवर लालबागाच्या राजाचं आगमन होणार असून, त्यानंतर आरती करून विसर्जन सोहळा सुरू होणार आहे. 

  • Ganesh Visarjan 2023 LIVE: लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गणेश गल्ली, मुंबईचा राजा गणेशोत्सव मंडळातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार विसर्जन मिरवणुकीचं नियोजन खालीलप्रमाणे. 
    विसर्जन सोहळा आरती - 8.00 वाजता
    विसर्जन मिरवणुक सुरुवात - 8.15 वाजता 
    पहिली पुष्पवृष्टी - 8.30 वाजता 
    मुख्य प्रवेशद्वार कार्यक्रम - 12 वाजता 

     

  • Ganesh Visarjan 2023 LIVE: बाप्पाला निरोप देण्यासाठी लालबाग परळ परिसरामध्ये मोठा जनसमुदाय लोटतो. ढोल ताशाच्या गजरामध्ये गाजत वाजत मोठ्या जल्लोषात बाप्पाची विसर्जन मिरवणूक काढली जाते.बाप्पाला निरोप देण्यासाठी तरुणाई मोठी गर्दी करत असते. यावर्षीही हेच वातावरण पाहायला मिळणार आहे. 

     

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link