Ganesh Visarjan Live Blog : मुंबई, पुणेसह राज्यभरात गणपती बाप्पाला भक्तीभावाने निरोप

Maharashtra Ganesh Visarjan 2023 LIVE : गेल्या 10 दिवसांपासून गणराया पाहुणचार घेऊन आज गावी निघणार आहे. पुण्यातील मानाचे गणपती, नागपूरचा राजासह महाराष्ट्रातील गणेश विसर्जनची प्रत्येक अपडेट एका क्लिकवर   

Ganesh Visarjan Live Blog : मुंबई, पुणेसह राज्यभरात गणपती बाप्पाला भक्तीभावाने निरोप

Maharashtra Ganesh Visarjan 2023 LIVE : यथासांग पाहुचार घेतल्यावर पुढच्या वर्षी लवकर येण्यासाठी गावी निघणार आहे. अख्खा देश गेल्या काही दिवसांमध्ये बाप्पामय झाला आहे. वाजत गाजत बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे. मुंबई, पुणे, नागपूरसह राज्यातील गणेश विसर्जनाची प्रत्येक दृष्य आणि पोलीस बंदोबस्तासह वाहतूक व्यवस्थेबद्दल प्रत्येक अपडेट...

 

28 Sep 2023, 22:09 वाजता

वाशिष्टीच्या नदी पत्रात बोटीतून गणपती बाप्पाना निरोप, वाशिष्टीच्या नदीपात्रात खोल पाण्यात गणपती आणि गौरीचा विसर्जन करण्यात आलं. पारंपारिक पद्धतीने होडीने गणपती बाप्पा डोहात आणून विसर्जन करण्याची प्रथा आहे

28 Sep 2023, 21:53 वाजता

जळगाव
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव इथं गणेश भक्त सागर खेडकर या तरुणाने आपल्या लाडक्या बाप्पाला अनोख्या पद्धतीने निरोप दिला आहे पाण्याच्या तळाशी जाऊन सागर खेडकर या तरुणाने आपल्या लाडक्या बाप्पाला भक्तीपूर्ण वातावरणात निरोप दिला असून पाण्याच्या तळाशी जात बाप्पाला निरोप देताना ची दृश्य ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

28 Sep 2023, 20:37 वाजता

नाशिक
नाशिकमध्येही गणेश विसर्जनाला गालबोट लागल्याची बातमी समोर आली आहे. मित्रांसोबत विसर्जनसाठी आलेले दोन जण वालदेवी धरणात बुडाले. 

28 Sep 2023, 19:57 वाजता

रत्नागिरी
टेम्पो विसर्जन मिरवणुकीत घुसल्याने 15 पेक्षा जास्त भाविक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील पाचेरी आगार इथं ही दुर्घटना घडली आहे. टेम्पोचा ब्रेक फेल झाल्याने चालकाचं नियंत्रण सुटलं आणि मिरवणुकीत टेम्पो घुसल्याची प्राथमिक माहिती आहे. 

28 Sep 2023, 19:41 वाजता

रायगड
गणेश विसर्जनासाठी गेलेले चार गणेश भक्त वाहून गेल्याची घटना रायगडमध्ये घडली आहे. कर्जत तालुक्यातील उल्हास नदीत पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने हे चौघं वाहून गेले. यातला एक जण सुखरुप बचावला तरएकाचा मृतदेह सापडला आहे.  दोन जण अद्याप बेपत्ता आहे. बेपत्ता गणेश भक्तांचा शोध  सुरु आहे. 

 

28 Sep 2023, 19:25 वाजता

Ganesh Visarjan 2023 Maharashtra LIVE : नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीला लागले गालबोट
- दोन तरुणांमध्ये झाली हाणामारी
- भद्रकाली परिसरात झाली हाणामारी
- हाणामारीत एक जण गंभीर जखमी
- डोक्याला जबर मार लागल्याने रकताच्या थारोळ्यात पडला खाली 
- जखमीला पोलिसांनी केले रुग्णालयात दाखल; दुसऱ्याला घेतले ताब्यात 
- हाणामारीचं कारण अस्पष्ट

 

28 Sep 2023, 17:59 वाजता

Ganesh Visarjan 2023 Maharashtra LIVE : वाशिम मध्ये मुस्लिम बांधवांच्या हस्ते गणेश विसर्जन करून दिला हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश 

आज एकीकडे गणेश विसर्जन होत असताना दुसरीकडे ईद सणसुद्धा मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय आणि यातच हिंदू मुस्लिम एकतेच अनोखं प्रतीक हे वाशिम मध्ये पाहायला मिळत Eus. वाशिमचे जुम्मा शाहा हे आपल्या सहकाऱ्यांसह गेल्या बारा वर्षापासून वाशिम शहरातील असलेल्या देवतलावात तरफ्याच्या साह्याने गणपतीचे व्यवस्थित खोल पाण्यात गणेश विसर्जन करत असतात. यावर्षी ईदच्या दिवशीही त्यांनी ही परंपरा कायम ठेवली आहे.

28 Sep 2023, 17:10 वाजता

Ganesh Visarjan 2023 Maharashtra LIVE : पुण्यातील मानाचा पहिल्या कसबा गणपतीचे 4 वाजून 36 मिनिटांत पतंगा नटराज घाटावर विसर्जन

28 Sep 2023, 17:05 वाजता

Ganesh Visarjan 2023 Maharashtra LIVE : पुणे शहर आणि उपनगरात जोरदार पाऊस;
वडगाव धायरी परिसरात रस्त्याला नदीचे स्वरूप

 

28 Sep 2023, 16:45 वाजता

Ganesh Visarjan 2023 Maharashtra LIVE : महाराष्ट्र सदनातील गणपतीचं विसर्जन

राजधानी नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथील लाडक्या गणरायाला मोठ्या भक्ती भावात निरोप दिला जात आहे. महाराष्ट्र सदनात गणपती बाप्पांच्या विसर्जनाची तयारी सुरू झाली आहे. अभिनेते आणि भाजप खासदार मनोज तिवारी यांनी बाप्पाची आरती करत निरोप दिला.सोबतच काँग्रेसचे खासदार मुकुल वासनिक देखील यावेळी उपस्थित होते