Mumbai Ganapati Visarjan 2024 Live Updates: पुढच्या वर्षी लवकर या...लालबागच्या राजाचं विसर्जन संपन्न
Mumbai Ganapati Visarjan Celebration Live Updates: किती वाजता होणार विसर्जन? जाणून घ्या मुंबई प्रशासनानं कशी केलीय तयारी...
Ganpati Visarjan 2024 in Mumbai Celebration Live Updates: 10 दिवसांचा पाहुणचार स्वीकारल्यानंतर लाडका बाप्पा आता सर्वांचा निरोप घेत पुढच्या प्रवासासाठी निघाला. उत्सवाच्या या माहोलानंतर आता सर्वत्र कल्ला असणारं आणि गजबजाटाचं वातावरण शमून घड्याळाच्या काट्यावर धावणारे मुंबईकर आता पुन्हा एकदा त्यांच्या दिनचर्येमध्ये व्यग्र होतील. मनात आस असेल ती म्हणजे बाप्पा पुढच्या वर्षी येणार तेव्हा त्यांचं स्वागत कसं करायची याबाबतची आणि इच्छा असेल ती बाप्पानं आपल्यावर वरदहस्त कायम ठेवावा याची... गणपती बाप्पा मोरया!!!
Latest Updates
Mumbai Ganapati Visarjan 2024 Live Updates: लालबागच्या राजामागोमाग इतरही गणपतींचं विसर्जन
अनंत चतुर्दशच्या दुसऱ्या दिवशी गिरगाव चौपाटीवर तब्बवल 24 तासांनंतर लालबागच्या राजाचं विसर्जन करण्यात आलं. त्यानंतर इथं आलेल्या इतरही सार्वजनिक गणेशमूर्तींचं विसर्जन पार पडलं. यावेळी पालिका प्रशासन, जीवरक्षक दल आणि कोळी बांधवांनी इथं आलेल्या गणेशोत्सव मंडळांना सहकार्य केल्याचं पाहायला मिळालं.
Mumbai Ganapati Visarjan 2024 Live Updates: 24 तासांच्या विसर्जन मिरवणुकीनंतर लालबागच्या राजाचं विसर्जन
लाखो भाविक, त्यांच्या मनीच्या भावना आणि असंख्य प्रार्थना अशा वातावरणात लालबागच्या राजाचा विसर्जन सोहला पार पडला. तब्बल 24 तासांनंतर श्रींच्या मूर्तीचं विसर्जन गिरगाव चौपाटी येथील अथांग समुद्रात करण्यात आलं. यावेळी पुढच्या वर्षी लवकर या असे जयघोष भाविकांनी करत बाप्पाला निरोप दिला.
Mumbai Ganapati Visarjan 2024 Live Updates: लालबागच्या राजाला कोळी बांधवांची सलामी
कोळी बांधवांनी ब्रास बँड आणि बोटींच्या माध्यमातून भर समुद्रात लालबागच्या राजाला सलामी दिली. ज्यानंतर राजा तराफ्यावर बसून विसर्जनास सज्ज झाला. यावेळी गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषानं संपूर्ण परिसर निनादून निघाला.
Mumbai Ganapati Visarjan 2024 Live Updates: अद्यापही अनेक गणेशमूर्ती विसर्जनाच्या प्रतीक्षेत
मुंबईतील गिरगाव चौपाटीवर एकिकडे लालबागच्या राजाचं विसर्जन सुरू असतानाच दुसरीकडे अद्यापही अनेक गणेश मूर्ती विसर्जनासाठी प्रतीक्षेत असून, त्याकरता मोठ्या प्रमाणात मंडळाचे कार्यकर्ते आणि गणेशभक्तांनी इथं गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे.
Mumbai Ganapati Visarjan 2024 Live Updates: दिवस बदलला पण, विसर्जन मिरवणुका सुरूच
मानाच्या लालबाग राजाची विसर्जन मिरवणूक अद्यापही सुरुच आहे. साधारण 20 ते 21 तासांपासून लालबागच्या राजाची मिरवणूक सुरूच असून गणेशभक्तांचा उत्साह तसूभरही कमी झालेला नाही.
Mumbai Ganapati Visarjan 2024 Live Updates: आतापर्यंत किती गणेशमूर्तींचं विसर्जन?
श्रीगणेश मूर्ती 11 व्या दिवसाच्या विसर्जनाचा अहवाल काल मध्य रात्री 12 वाजेपर्यंत :
सर्वजनिक - 2593
घरगुती-26577
गौरी - ४९४
एकूण = 29364
त्यापैकी कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन:
सर्वजनिक - 454
घरगुती – १०४७५
गौरी – ४७
एकूण = 10976
विसर्जनाच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी लाखो भक्तांची गर्दी
मुंबईमधील लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी लाखो भक्तांनी गर्दी केली आहे. ही शान कोणाची लालबागच्या राजाची या जयघोषात लाडक्या गणरायाला निरोप देण्यात येत आहे.
मुंबईत आतापर्यंत 7574 गणेश मूर्तींचं विसर्जन
मुंबईत आतापर्यंत 7574 गणेश मूर्तींचं विसर्जन झाल्याची माहिती मुंबई पालिकेकडून देण्यात आली आहे. या, सार्वजनिक गणपती - 300, घरगुती गणपती - 7227, गौरी गणपती - 47 यांचा समावेश आहे.
लालबागच्या राजावर श्रॉफ बिल्डिंगकडून पुष्पवृष्टी
लालबागच्या राजावर श्रॉफ बिल्डिंगकडून पुष्पवृष्टी, श्रॉफ बिल्डिंग समितीकडून पुष्पवृष्टीची परंपरा आहे. या वर्षी श्रॉफ बिल्डिंगकडून एक हजार किलो फुलांची ऑर्डर देण्यात आली आहे.
चिंचपोकळीचा चिंतामणी गिरगावकडे रवाना
चिंचपोकळीचा चिंतामणी मुख्य प्रवेशद्वारातून बाहेर पडत आहे. यानंतर तो लालबागच्या पुलाखालून चिंचपोकळी पूलावरून गिरगावकडे रवाना होईल
Mumbai Ganapati Visarjan 2024 Live Updates: मुंबईतील चिंचपोकळी परिरात प्रचंड गर्दी
चिंचपोकळी, लालबाग आणि परळ परिसरात तूफान गर्दी. लालबागचा राजा गणेश गल्ली परिसरातून पुढे मार्गस्थ, तर नरेपार्क, गणेशगल्ली आणि इतर मंडळांचे गणपती चिंचपोकळी पुलावरून पुढील मिरवणुकीसाठी मार्गस्थ.
Mumbai Ganapati Visarjan 2024 Live Updates: मुंबईच्या राजावर पुष्पवृष्टी
चिंचपोकळीतील श्रॉफ बिल्डींग येथे गणेशगल्लीचा गणपती अर्थात मुंबईच्या राजावर पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी 'ही शान कोणाची, मुंबईच्या राजाची...' असा एकच जयघोष झाल्याचं पाहायला मिळालं.
Mumbai Ganapati Visarjan 2024 Live Updates: गिरगाव चौपाटीवर मोठे गणपती येण्यास सुरुवात
10 दिवसांच्या पाहुणचारानंतर विसर्जनासाठी निघालेल्या बाप्पांचं गिरगाव चौपाटीवर आगमन होण्यास सुरुवात झाली आहे. घरगुती गणपतींसमवेत इथं सार्वजनिक गणेशमूर्तींचंही आगमन होण्यास सुरुवात.
Mumbai Ganapati Visarjan 2024 Live Updates: अनंत चतुर्दशीच्या धर्तीवर गिरगाव चौपाटीवर प्रशासन सज्ज
अनंत चतुर्दशीचा उत्सव मुंबई महाराष्ट्रासह देशभरात साजरा केला जात आहे. मुंबईच्या गिरगांव चौपाटीवर गणेश विसर्जनासाठी लक्षावधी गणेशभक्त हजेरी लावतात. त्या अनुषंगाने सरकार, महापालिका आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून नागरिकांच्या काळजीच्या दृष्टीने खबरदारी घेतली जात आहे.
Mumbai Ganapati Visarjan 2024 Live Updates: प्रचंड गर्दीतून वाट काढत लालबागचा राजा मार्गस्थ
प्रचंड गर्दीतून वाट काढत लालबागचा राजा विसर्जन मार्गावर मार्गस्थ झाला आहे. सध्याच्या घडीला राजाची मिरवणूक लालबाग चौकातून युटर्न घेवून भारतमाता चौकाकडे जात आहे. इथून पुन्हा गणपतीची ही भव्य मिरवणूक निर्धारित मार्गावर मार्गस्थ होईल. सध्या लालबागच्या राजासमवेत कॉटनचा राजा आणि इतरही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्ती मार्गस्थ झाल्या आहे.
Mumbai Ganapati Visarjan 2024 Live Updates: विसर्जन मिरवणुकीसाठी लालबागमध्ये येताय?
लालबाग आणि नजीकच्या परिसरामध्ये विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचंड गर्दी झाली असून, या गर्दीमध्ये येण्याआधी येथील परिस्थितीचा आढावा घेऊन येण्याचं आवाहन करण्यात येत आहे. शिवाय गर्दीच्या समयी नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहनही गणेशोत्सव मंडळं करत आहेत.
Mumbai Ganapati Visarjan 2024 Live Updates: पुष्पवृष्टीनं न्हाऊन निघाल्या गणेमूर्ती
तेजुकायाचा राजा गणेश मंडळाच्या श्रींच्या मूर्तीवर श्रॉफ बिल्डिंग येथे सुरेख पुष्पवृष्टी. दृश्य मन मोहणारी.
Mumbai Ganapati Visarjan 2024 Live Updates: लालबागमध्ये तोबा गर्दी....
लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाच्या मुख्य प्रवेशद्वारावर तोबा गर्दी झाली असून, मंडळाचं मुख्य प्रवेशद्वार तोडून भाविकांनी गणपतीपुढे जाण्याचा प्रयत्न केला आहे. या भागामध्ये सध्या प्रचंड गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे.
Mumbai Ganapati Visarjan 2024 Live Updates: श्रॉफ बिल्डींग पुष्पवृष्टीवर सर्वांच्या नजरा
चिंचपोकळी इथं असणाऱ्या श्रॉफ बिल्डींग पुष्पवृष्टी मंडळाच्या माध्यमातून आता इथून जाणाऱ्या सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या बाप्पांवर पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. इथं प्रथम परळच्या महाराजावर पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. यानंतर या मार्गावरून अनेक गणपतींच्या विसर्जन मिरवणुका पुढे जातील.
Mumbai Ganapati Visarjan 2024 Live Updates: लालबागच्या रस्त्यांवर गुलालाची उधळण
अनेक सार्वजनिक मंडळांचे गणपती विसर्जनास निघाले असल्यामुळं लालबाग परिसरात गणपती बाप्पा मोरया चाच जयघोष. रस्त्यांवर गुलालाची उधळण आणि ढोल ताशांचा गजर.
Mumbai Ganapati Visarjan 2024 Live Updates: मुंबईचा राजा, राजा तेजुकायाचा विसर्जनासाठी मार्गस्थ
लालबागमधील मानाचे गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ. मुंबईच्या राजामागोमाग तेजुकायाचा राजाही विसर्जनास निघाला. ढोलताशांच्या गजरात गणपती विसर्जनासाठी असंख्य भाविकांची गर्दी...
लालबागचा राजाच्या मिरवणुकीसाठी 5 हजार पोलिसांचा बंदोबस्त
'लालबागचा राजा'च्या विसर्जन मिरवणुकीला होणारी गर्दी पाहता या मिरवणुकीसाठी 5 हजार पोलीस जागोजागी तैनात करण्यात आले आहेत. यामध्ये काही संवेदनशील भागांचाही समावेश आहे.
Mumbai Ganapati Visarjan 2024 Live Updates: पुढच्या वर्षी लवकर या....
सुखकर्ता दु:खहर्ता... अशा आरतीच्या नादात गणेशगल्लीच्या गणरायाची आरती संपन्न झाली असून, शेकडो गणेशभक्तांनी एका सुरात आरती गात गणरायाला आळवलं. पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत गणरायाला निरोप देण्यासाठी हे भक्त सज्ज झाले आणि श्रींच्या विसर्जन मिरवणुकीस सुरुवात झाली.
Mumbai Ganapati Visarjan 2024 Live Updates: वाहतुकीतील बदल
कोस्टल रोड (Coastal Road): मुंबईकरांचा प्रवास सुकर होण्यासाठी कोस्टल रोड 18 सप्टेंबरपर्यंत सुरूच राहणार आहे.
मरीन ड्राइव (Marine Drive): एन एस रोडच्या उत्तरेकडील वाहतूक गरज पडल्यास इस्लाम जिमखान्यावरून कोस्टल रोडमार्गे वळवण्यात येईल.
ईस्टर्न फ्रीवे (Eastern Freeway): पी डी’मेलो रोड, CSMT जंक्शन, प्रिंसेस स्ट्रीट या मार्गांवर वाहतुकीचे कोणतेही निर्बंध नाहीत.
दक्षिण मुंबईमध्ये नाथालाल पारेख मार्ग, कॅप्टन प्रकाश पेठे आणि रामभाऊ साळगावकर मार्ग वाहतुकीसाठी बंद असतील.
Mumbai Ganapati Visarjan 2024 Live Updates: शहरातील विविध भागांतून गणेशभक्तांची लालबागमध्ये गर्दी
मुंबई आणि उपनगरांतून अनेक गणेशभक्तांनी लालबाग परळची वाट धरत या भागांमध्ये गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. पहाटेपासूनच इथं ढोलताशा पथकं, ब्रास बँड पथकं आणि मोठ्या संख्येनं गणेश भक्त लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी दाखल झाले आहेत.
Mumbai Ganapati Visarjan 2024 Live Updates: किती वाजता सुरू होणार विसर्जन मिरवणुका?
मुंबईतील मानाच्या अशा गणपतींच्या विसर्जन मिरवणुका साधारण 8 ते 9 वाजण्याच्या सुमारास सुरू होणार आहेत. तिथं गिरगावममधील गणपतींच्या मिरवणुकांची सुरुवात मात्र काशीही उशिरानं होणार आहे.
मुंबईचा राजा अशी ओळख असणाऱ्या गणेशगल्लीच्या गणरायाची विसर्जन मिरवणूक सकाळी 8 वाजता सुरू होणार असून, ही मिरवणूक डॉ. एस एस राव मार्ग, जीजीभाई लेन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, चिंचपोकळी पुलावरून थेट बकरी अड्डा इथून एस ब्रिजला उजवं वळण घेऊन संत गाडगे महाराज चौकातून निघेल. तिथून पुढं नायर रुग्णालय, मुंबई सेंट्रल, डी बी मार्ग, लॅमिंटन रोड मार्गे गिरगाव चौपाटी इथं दाखल होईल. इथं श्रींच्या मूर्तीचं विसर्जन होणार आहे.