नवी मुंबई: हार्बर रेल्वेमार्गावर शनिवारी दुपारी क्रॉसिंग ओलांडणाऱ्या बसला ट्रेनने धडक दिल्याची घटना घडली. सानपाडा कारशेड आणि जुईनगर स्थानकादरम्यान असणाऱ्या रेल्वे क्रॉसिंगवर हा प्रकार घडला. रेल्वेच्या माहितीनुसार ही क्रॉसिंग अनधिकृत होती. दुपारी तीनच्या सुमारास हा अपघात झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एनएमएमटीची बसला रेल्वे क्रॉसिंगवरून जात असताना रिकाम्या ट्रेनने धडक दिली. रेल्वेच्या धडकेत बसच्या एका बाजूचा चेंदामेंदा झालाय. ही ट्रेन वेगात असती तर अनर्थ ओढावून शकला असता. मात्र, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.


यामध्ये तीन प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडून देण्यात आले. मात्र, यानंतर रेल्वे प्रशासनाकडून या अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.