मुंबई : पश्चिम रेल्वेकडून लोकल पासला मुदतवाढ देण्यात आली आहे. दुस-या लाटेआधी पास काढलेल्या नागरिकांना दिलासा देण्यात आला आहे. तर दुसऱ्या बाजूला विना तिकीट प्रवास करणा-या चाळीस हजार प्रवाशांकडून एक कोटींचा दंड वसूल करण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनाची दुसरी लाट येताच सामान्यांच्या लोकल प्रवासावर एप्रिल २०२१ पासून निर्बंध घालण्यात आले होते. फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच लोकलने प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र असे असले तरीही अनेकजण लोकलने प्रवास करत होते. मात्र काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन डोस झालेल्यांना परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला. 


मात्र या निर्णयाअगोदर ज्या पासधारकांकडे पास असेल त्यांच काय? असा प्रश्न सामान्यांना पडला होता. त्यावर पश्चिम रेल्वेकडून लोकल पासला मुदतवाढ देण्यात आली आहे. कोरोना साथीच्या दुसऱ्या लाटेआधी लोकल रेल्वेचा पास काढलेल्या सामान्य नागरिकांच्या त्या पासला आता उर्वरित दिवसांसाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे.  पश्चिम रेल्वे प्रवाशांच्या  जुन्या पासला उर्वरित दिवसांसाठी मुदतवाढ न दिल्याने नाइलाजाने नवा पास काढावा लागत होता. एकीकडे मध्य रेल्वेने मुदतवाढीची अंमलबजावणी सुरू के ली असतानाच पश्चिम रेल्वेला मात्र त्याचा विसर पडला होता. परंतु आता गेल्या दोन दिवसांपासून मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती पश्चिम रेल्वेवरील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.


कोरोनाची दुसरी लाट येताच सामान्यांच्या लोकल प्रवासावर एप्रिल २०२१ पासून निर्बंध घालण्यात आले होते. त्यानंतर १५ ऑगस्टपासून प्रवासमुभा दिली होती. परंतु पासला मुदतवाढ दिली नव्हती. लोकलमध्ये गर्दी अगदीच धिम्या गतीनं वाढताना दिसतेय. लसीकरण पूर्ण झालेल्यांना लोकल प्रवासाला परवानगी देऊन आठवडा उलटला. पश्चिम रेल्वेवर सुमारे 88हजार जणांनी पास घेतले. तर मध्य रेल्वेवर 2लाखाच्या आसपास पास काढलेयत. पण प्रवासी संख्येत धिम्या गतीनं वाढ होतेय.