नवी दिल्ली : मार्गदर्शक तत्वांअभावी देशात कोरोना वणव्यासारखा पसरला असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलंय. कोर्टाकडून कोरोनाबाबत सरकारची कानउघाडणी करण्यात आली. कोरोनावरील उपचार सामान्य़ांना परवडणारे नाहीत तसेच खासगी रूग्णालयांच्या उपचारांवर मर्यादा हवी होती.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोना लॉकडाऊनच्या काळात मार्गदर्शक तत्त्व आणि प्रमाणित प्रक्रियेचं पालन न झाल्याचे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलंय. यामुळे कोरोना मोठ्या प्रमाणात पसरला. याच्या प्रतिबंधासाठी आणखी उपाययोजना करायला हव्या होत्या असे मत न्यायालयाने नोंदवले. 



कोरोना काळात राज्य आणि केंद्रामध्ये संवाद नसल्याचे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढलेयत. राज्याने केंद्राशी सुसंवादाने काम करायला हवं होतं असं न्यायालयानं म्हटलंय. 


कोरोनामुळे लागू झालेल्या लॉकडाऊन काळात नागरिकांना रोजीरोटीचा प्रश्न उद्भवला. लॉकडाऊनची पूर्वकल्पना देऊन नागरिकांच्या रोजीरोटीची व्यवस्था करत नियमांचे पालन करता येईल असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले.