मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना भाजप जागावाटपाची चर्चा काही प्रमाणात पुढे सरकली आहे. २०१४ लोकसभा निवडणुकीत जिंकलेल्या जागा त्याच पक्षाकडे कायम ठेवण्यावर सहमती झाली आहे. तर सात जागांबाबत अजून चर्चा पुढे सरकलेली नाही. २०१४ लोकसभा निवडणुकीमध्ये युती करत राज्यात भाजपाने २३ तर शिवसेनेन १८ जागांवर विजय मिळवला होता. या जागांवर संबंधित पक्ष आपापले उमेदवार उभे करणार आहे. चर्चा पुढे न सरकलेल्या आठ जागांमध्ये हिंगोली शिवसेनेने लढवली होती, तर नांदेड भाजपने. त्यामुळे या जागा त्या त्या पक्षांकडेच राहण्याची शक्यता आहे. बारामती राष्ट्रीय समाज पक्षाने लढवली होती. त्यावर अजून निर्णय झालेला नाही. हातकणंगलेच्या जागेवरही अजून निर्णय झालेला नाही. माढाच्या जागेवर भाजपचा दावा कायम आहे. कोल्हापूर शिवसेनेकडे राहण्याचीच शक्यता आहे. तर साताऱ्याच्या जागेचा निर्णय झालेला नाही. 


शिवसेनेला खूश करण्यासाठी भाजपचा प्रयत्न


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


दरम्यान, भाजप-शिवसेना युतीचा निर्णय मुंबईत होणार आहे, असे वृत्त होते. त्याबाबत एक पाऊल पुढे पडले आहे. युतीच्या जागा वाटबाबत बोलणी सुरु झाल्याचे दिसून येत आहे. युतीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबरोबर फोनवरुन चर्चा झाली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्याशी दिल्लीत चर्चा केली. त्यानंतर युतीचा निर्णय मुंबईत होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली होती.