Loksabha 2024 : लोकसभा निवडणूक 2024 साठी भाजपने (BJP) राज्यातील उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत अनेक मोठ्या नावांचा समावेश आहे. या यादीत वीस जागांचा समावेश आहे. युवा उमेदवारांना जास्त संधी देण्यात आली आहे. पंकजा मुंडे, स्मिता वाघ, सुजय विखे पाटीर, मिहिर कोटेचा, सुधीर मुनगंटीवार यांना पहिल्यांदाच खासदारकीचं तिकिट देण्यात आलंय. आता गुरुवारी महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. याच पत्रकार परिषदेत महायुतीतील उर्वरित जागांवरील उमेदवारांची घोषणा केली जाणार आहे. राष्ट्रवादी अजित पवार पक्ष आणि शिवसेना शिंदे पक्षाकडून उमेदवारांच्या नावाची घोषणा होणं बाकी आहे. मात्र गुरुवारी म्हणजे 28 मार्चला होणाऱ्या पत्रकार परिषदेच 48 च्या 48 जागांबाबत चित्र स्पष्ट होईल असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्टार प्रचारकांची यादी
महायुतीने महाराष्ट्रात 45+ चा नारा दिला आहे. त्यामुळे उमेदवार जिंकून आणण्यासाठी महायुतीने रणनिती आखली आहे. महाराष्ट्रातील महायुतीच्या लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी स्टार प्रचारकांची (Star Campaigner) नेमणूक करण्यात आलेली आहे. या स्टार प्रचारकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे , तसंच योगी आदित्यनाथ, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, अशोक चव्हाण, विनोद तावडे, पंकजा मुंडे आणि सुधीर मुनगंटीवार यांचा समावेश असणार आहे. 


नमो संवाद सभा
राज्यातील 19 हजार शक्ती केंद्रावर महायुतीच्या सभा आयोजित करण्यात येणार आहेत. 'नमो संवाद सभा' (Namo Sanwad Sabha) असं  संभेचं स्वरुन असणार आहे. यासाठी 300 वक्त़ांची फौज असणार आहे राज्यात जवळपास 21 हजार सभा होतील. पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भात सभा होतील. 2014 पूर्वीचा भारत आणि 2014 नंतरचा भारत हे विषय असेल. युवा वर्ग,ज्येष्ठ नागरीक, महिला यांच्यासाठी सरकार ने काय केल याची माहीती दिली जाणार आहे. 
4 कोटी नागरिकांपर्यंत पोहचण्याच ध्येय असल्याचं महायुतीने सांगितलंय. व्यापार प्रकोष्ठ, उद्योग प्रकोष्ठ, वाहतूक प्रकोष्ठ अशा विविध घटकांपर्यंत पोहचणार. नव मतदारांपर्यत पोहचण्यासाठी युवा मोर्चा प्रत्येक घरोघरी जाऊन युवकांची भेट घेणार आहे. कॉफी विथ युथ असे कार्यक्रम संपूर्ण राज्यभर राबवण्यात येणार आहेत. 


महाराष्ट्रात भाजप 19 हजार कॉर्नर सभा घेणार आहे. प्रत्येक विधानसभा क्षेत्रात 50 ते 60 छोट्या सभांचे नियोजन करण्यात आलं आहे. विकसित भारत, श्रीराम मंदीर, सीएए, कलम 370 यांसह स्थानिक घटकांचा विषय या सभांमधून मांडला जाणार आहे. शहरी आणि ग्रामीण भागात महिला, युवक, शेतकरी विषयांवर प्रचार केला जाणार आहे. तसंच मोदी आणि महायुती सरकारच्या योजनांचा पाढा वाचला जाणार आहे. शेवटच्या मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी भाजपने नियोजन केलं आहे. प्रत्येक लोकसभा मतदार संघात 300 ते 400 कॉर्नर सभा घेण्याचं उद्दीष्ट ठेवण्यात आलं आहे.