Loksabha 2024 : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे उमेदवार शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर लढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज ठाकरेंना (Raj Thackeray) महायुतीत देण्यात येणाऱ्या जागा मनसेचे उमेदवार (MNS Candidate) धनुष्यबाणावर लढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadanvis) आणि राज ठाकरेंमध्ये ताज हॉटेलमध्ये तब्बल दीड तास चर्चा झाली. या बैठकीत लोकसभा निवडणूक लढण्यावर चर्चा झाल्याची माहिती मिळतेय. लोकसभेसाठी दोन जागाही मनसेला सोडणार असल्याची माहिती मिळतेय. अमित शाहांच्या भेटीनंतरची ही बैठक महत्वाची मानली जातेय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज ठाकरेंचं चार्टर्ड प्लेन चर्चेत
राज ठाकरे यांचा मनसे पक्ष महायुतीत सामील होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं असतानाच त्यांचं चार्टर्ड प्लेनही चर्चेत आलं आहे. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे आणि अमित ठाकरे मुंबईहून दिल्लीला गेले होते. दिल्लीत दौऱ्यात त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. राज ठाकरे मुंबहून दिल्लीला आपल्या चार्टर्ड प्लेनने पोहोचले होते. 


राज ठाकरेंच्या चार्टर्ड प्लेनची खासियत
राज ठाकरेंचं चार्टर्ड प्लेन कस्टमाइज्ड कॅबिन, वायरलेस इंटरनेट, एडजस्टेबल रिक्लाइनिंग सीट अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे Flightradar24, Flyware आणि Airnav Radarbox सारखे फ्लाइट ट्रॅकिंग तंत्रज्ञानही या चार्टर्ड विमानाचा मागोवा घेऊ शकत नाहीत.


फ्लाइट ट्रॅकिंग प्लॅटफॉर्मच्या रडारपासून आपलं चार्टर्ड विमान दूर ठेवण्याचा जागतिक स्तरावर एक ट्रेंड बनला आहे. बिझनेस टायकूनपासून ते इलॉन मस्क, डोनाल्ड ट्रम्प आणि टेलर स्विफ्ट सारखे जगभरातील नेते आणि सेलिब्रिटी असं करतात. ते जाणूनबुजून आपल्या चार्टर्ड प्लेनचं ट्रॅकिंग बंद ठेवतात.


राज ठाकरे यांचं चार्टर्ड विमान अहमदाबादच्या एका व्यावसायिक चार्टर ऑपरेटरकडे नोंदणीकृत आहे.  यूएस फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन (FAA) प्रोग्रामच्या धर्तीवर भारतात खासगी चार्टर्ड विमानांचे नियम निश्चित करण्यात आले आहेत. भारतात अनेक नेते आणि सेलिब्रेटिआपली गोपनियता कायम ठेवण्यासाठी या नियमांचा वापर करतात. 


लोकसभा निवडणुकीत ठाकरे वि. ठाकरे?
दरम्यान, 2006 मध्ये शिवसेना सोडून राज ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली... तेव्हापासून महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरे हे नाव महत्त्वाचं राहिलंय... राज ठाकरेंच्या प्रत्येक सभेला अलोट गर्दी होते.. आताही महायुतीत मनसेच्या निमित्ताने चौथा भिडू आल्यास तर महायुतीची ताकद नक्कीच वाढणार आहे... राज ठाकरे जर महायुतीत आले तर उद्धव ठाकरेंकडून होणा-या हल्ल्यांना ते चोख प्रत्युत्तर देऊ शकतात... मुंबईतही ठाकरे हे नाव महायुतीसाठी लाभदायक ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.. म्हणूनच ठाकरे विरुद्ध ठाकरे लढाई करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे