Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा शिवसेना शिंदे विरुद्ध शिवसेना ठाकरे वाद पेटला आहे. ठाकरे गटाच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedy) यांनी केलेल्या एका वक्तव्यावरुन ठाकरे गट आणि शिंदे गटात (Tahckeray vs Shinde) आरोप प्रत्यारोप सुरु झाला आहे. मुंबईतल्या घाटकोपर इथं महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील यांची निवडणूक प्रचार सभा पार पडली. या सभेत बोलताना प्रियंका चतुर्वेदी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्यावर वादग्रस्त टीका केली. प्रियंका चतुर्वेदी यांच्या टीकेला आता शिंदे गटाने जोरदार प्रत्यत्तर दिलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'माझा बाप महागद्दार'
प्रियंका चतुर्वेदी यांच्या गद्दार वक्तव्यावर नुकताच शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेल्या संजय निरुपम यांनी जोरदार हल्लाबोल केलाय. आदित्य ठाकरे यांच्या कपाळावर लिहिल पाहिजे माझा बाप महा गद्दार आहे. कारण त्याच्या वडिलांनी भाजपासोबत युती तोडून गद्दारी केली, अशी टीका संजय निरुपम यांनी केलीय. तसंच प्रियंका चतुर्वेदी यांनी माफी मागावी अशी मागणीही संजय निरुपम यांनी केलीय.


मनीषा कायंदे यांचं उत्तर
प्रियांका चतुर्वेदींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि  डॉ.श्रीकांत शिंदे यांच्याबद्दल गद्दारी वरून केलेल्या वक्तव्याला मनीषा कायंदे यांनी उत्तर दिलंय. अनेक वर्षांपासून उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात प्रियांका चतुर्वेदी निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. प्रियांका चतुर्वेदी यांना लोकसभेत निवडून जायचं आहे. मात्र देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट असल्याने आपण निवडून येणार नाहीत. म्हणून त्या वैफल्यग्रस्त झाल्या आहेत, अशी टीका कायंदे यांनी केलीय. त्यांचेच लोक बोलतात की, त्या संध्याकाळनंतर भेटत नाहीत. 8 नंतर त्या उपलब्ध नसतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 24 तास लोकांसाठी उपलब्ध असतात. डॉ. श्रीकांत शिंदे  देखील 24 तास लोकांसाठी काम करतात. मग प्रियांका चतुर्वेदी का उपलब्ध नसतात ? प्रियांका चतुर्वेदी यांना खासदारकी लढायची आहे. तर आपल्याबद्दल लोक काय बोलतात याचा त्यांनी विचार करायला हवा. त्यांच्याबद्दलचे रिपोर्ट्स काय सांगतात, याचे उत्तर प्रियांका चतुर्वेदी यांनी द्यावं, असं आव्हान कायंदे यांनी केलंय.


चतुर्वेदींना खासदारकी कशी मिळाली?
तर शीतल म्हात्रे यांनीही प्रियंका चतुर्वेदी यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.  प्रियंका चतुर्वेदी यांनी खासदारकी कशी मिळवली, हे लोकांना सांगितलं पाहिजे. मराठीचा गंध नसताना, कुठलेही कतृत्व नसताना इतकेच काय शिवसेनेशी संबंध नसताना चतुर्वेदी तुम्ही खासदारकी मिळवली. आता खासदारकीची टर्म संपत असताना तुमची जी काही तफफड सुरु आहे ती आपल्या वक्तव्यातून दिसतेय.  बुलंदी सिनेमातला एक डायलॉग आहे ‘बिल्ली के दात गिरे नहीं और चली शेर के मूँह में हाथ डालने’ अशीच काहीशी परिस्थिती प्रियंका चतुर्वेदी यांची झाली आहे. 


तुमचा काही संबध नसताना दावोसला जाऊन गुलाबी थंडीत काय केले हेही प्रियंका चतुर्वेदी यांनी लोकांना सांगितले पाहिजे. पुन्हा खासदारकी मिळवण्यासाठी गेल्या आठड्यात कोणाकोणाला भेटलात आणि स्वत:जवळ आदित्य ठाकरेंचे कसे कसे फोटोग्राफ आहेत हे दाखवून तरी मला खासदारकी द्या ,असे सांगणाऱ्या प्रियंका चतुर्वेदी यांनी बोलताना विचार करावा आणि भान ठेवावे असा इशारा शीतल म्हात्रे यांनी दिला आहे. 


काय म्हणाल्या प्रियंका चतुर्वेदी
महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दीना पाटील यांच्यासाठी एक प्रचारसभेत बोलताना प्रियंका चतुर्वेदी यांनी 'एकनाथ शिंदे कोण आहेस तू? कोण आहेस तू? अशी घोषणा दिली. यावर समोलच्या गर्दीने 'गद्दार, गद्दार' अशी प्रतिक्रिया दिली.. ठाण्यापर्यंत हा आवाज पोहोचला पाहिजे. गद्दार गद्दारच राहणार' असं त्या म्हणाल्या.


त्यानंतर त्यांनी अमिताभ बच्चन यांच्या गाजलेल्या 'दीवार' सिनेमाचा उल्लेख केला. दीवार सिनेमात अमिताभ बच्चन त्याचा हात दाखवतो, हातावर 'मेरा बाप चोर हैं' असं त्यावर लिहिलेलं असतं, तसंच श्रीकांत शिंदेच्या कपाळावर लिहिलय, 'मेरा बाप गद्दार हैं', अशी टीका प्रियंका चतुर्वेदी यांनी केली होती.