लोकसभा निवडणूक २०१९ : मुंबई दक्षिण मतदारसंघातील `रणसंग्राम`
लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईमध्ये शेवटच्या टप्प्यात २९ एप्रिलला मतदान होणार आहे.
मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईमध्ये शेवटच्या टप्प्यात २९ एप्रिलला मतदान होणार आहे. राज्यामध्ये भाजप-शिवसेनेची युती तर काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाली आहे. याचबरोबर प्रकाश आंबेडकर यांचा भारिप बहुजन महासंघ आणि एमआयएम हे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत मुंबईमधून भाजप-शिवसेना युतीने सगळ्या सहा जागांवर विजय मिळवला होता.
या निवडणुकीत मुंबई दक्षिण मतदारसंघात शिवसेनेने अरविंद सावंत यांना उमेदवारी दिली आहे. अरविंद सावंत यांचा सामना काँग्रेसच्या मिलिंद देवरा यांच्याशी आहे.
२०१४ निवडणुकीचे निकाल
२०१४ सालच्या निवडणुकीमध्ये मुंबई दक्षिण मतदारसंघातून शिवसेनेच्या अरविंद सावंत यांनी काँग्रेसच्या मुरली देवरा यांचा १,२८,१४८ मतांनी पराभव केला होता.
२०१४ निवडणुकीची आकडेवारी
उमेदवार |
पक्ष |
मिळालेली मतं |
अरविंद सावंत | शिवसेना | ३,७४,६०९ |
मुरली देवरा | काँग्रेस | २,४६,०४५ |
बाळा नांदगावकर | मनसे | ८४,७७३ |
मीरा सन्याल | आप | ४०,२९८ |
नोटा | ९,५७३ |