Loksabha election 2024 : महायुती आणि महाविकासआघाडी यांच्यामध्ये संघर्षाची ठिणगी पडलेली असतानाच आता बडे नेते किंबहुना कधीकाधी एका पक्षात असणारे नेते एकमेकांवर गंभीर आरोप करत खळबळजनक गौप्यस्फोट करताना दिसत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर असेक काही आरोप केले आणि राजकीय वर्तुळासोबतच मतदारांच्याही नजरा वळवल्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झी २४तासच्या 'टू द पॉईंट' या विशेष मुलाखतीत मुख्यमंत्री शिंदेंनी उद्धव ठाकरेंबद्दल एक गौप्यस्फोट केला. 'उद्धव ठाकरे यांनी केवळ भाजपसोबतच नाही, तर शरद पवारांसोबतही बेईमानी केली...मविआ सरकारमध्ये असताना मोदींसोबत जाण्याची चर्चा उद्धव ठाकरे करत होते' असा गौप्यस्फोट त्यांनी केला. 


उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रिपदाबाबत शिंदेंनी मोठा गौप्यस्फोट केला. उद्धव ठाकरे यांनीच मुख्यमंत्री पदासाठी स्वत:चं नाव सुचवण्यासाठी पवारांकडे दोन माणसं पाठवली होती असं वक्तव्य मुख्यमंत्री शिंदेंनी या विशेष मुलाखतीदरम्यान केलं. 'जर बाळासाहेब असते तर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपद घेऊ दिलं नसतं', असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.


हेसुद्धा वाचा : Loksabha Election 2024 Live Updates : लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील प्रचार तोफा थंडावणार



सध्या राज्यात सत्तांतर कसं झालं, कोणी कशी गद्दारी केली याच मुद्द्यांवरून प्रचार सुरु आहेत, यासंदर्भातील प्रश्नार्थक वक्तव्यावर उत्तर देताना, 'त्यांच्याकडे मुद्दे नाहीत... आमच्याकडे विकासाचे मुद्दे आहेत. त्यामुळे विरोधक ज्या चर्चा पसरवत आहेत, ज्या शक्यता निर्माण करत आहेत त्याला आता दोन वर्ष झाली. तुम्ही आमच्याबद्दल गद्दारीची भाषा करता. पण तुम्ही 2019 ला लोकांच्या पाठीत खंजीर खुपसला. भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला, बाळासाहेबांचे विचार पायदशी तुडवले, त्यांना नको हवं होतं ते तुम्ही केलं. जे बाळासाहेब काँग्रेस माझी होऊ देणार नाही असं म्हणायचे त्या काँग्रेसला तुम्ही डोक्यावर घेतलं, सरकार बनवलं, मुख्यमंत्री बनलात. बाळासाहेब म्हणायचे शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवा, तुम्ही बाळासाहेबांचं स्वप्न साकार करतो म्हणालात.... इथं मला मुख्यमंत्री बनवायचा विषय नाही पण तुम्ही सर्वसामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवायला हवं होतं. त्याला डावलून तुम्ही स्वत: बसलात. एका मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीच्या मोहापायी तुम्ही बाळासाहेबांची, युतीची सर्व विचारधारा पायदळी तुडवली. मिळवलं काय?', असा सवाल केला.