Loksabha Election 2024 Live Updates : मुंबई महाराष्ट्राचे हे लुटारु; उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका

Loksabha Election : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील प्रचार आज सुरु आहे. राज्यात 20 मे रोजी 13 जागांसाठी मतदान होणार आहे. 

Loksabha Election 2024 Live Updates : मुंबई महाराष्ट्राचे हे लुटारु; उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका

लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील प्रचार आज थांबणार आहे. राज्यातील 13 जागांसाठी 20 मे रोजी मतदान होणार आहे. मुंबई, ठाणे, पालघर, धुळे, नाशिक, नंदूरबारमध्ये प्रचाराच्या तोफा थंडावणार आहे. आज प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने महायुती, मविआकडून प्रचाराला जोर लावला आहे. रॅली, सभांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा उमेदवारांचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज ठाणे शहर मतदारसंघ पिंजून काढणार आहेत. मीरा-भाईंदर, ओवळा माजिवडा, कोपरी-पाचपाखाडीत एकनाथ शिंदेंचा आज रोड शो होणार आहे. ठाण्याचे उमेदवार नरेश म्हस्केंसाठी शिंदे रोड शो काढतील. ठाण्यात राजन विचारे विरुद्ध नरेश म्हस्के असा सामना होतोय.. 

18 May 2024, 12:29 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates : मी काय हिंदू धर्म सोडला नाही तर मी भाजपला लाथ मारून सोडले - उद्धव ठाकरे 

काल तर मोदीजींनी कहर केला. तुमचा जाहीरनामा खाओवादी आहे,  मुंबई महाराष्ट्राचे हे लुटारू आहे - उद्धव ठाकरेंनी या शब्दात भाजपवर टीका केली. 

 

 

 

18 May 2024, 11:48 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates : नाशिकमध्ये ठाकरे गट शिंदे गट आमने सामने

- नाशिक मध्ये शिंदे गट आणि ठाकरे गट आमने-सामने
- नाशिकच्या भगूर मध्ये महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे यांची आज होती प्रचार रॅली
- प्रचार रॅली दरम्यान भगूर मध्ये ही रॅली शिंदे गटाचे संपर्कप्रमुख विजय करंजकर यांच्या घरासमोर ही रॅली आली असता झाली घोषणाबाजी
- ठाकरे गट आणि शिंदे गट एकमेकांनी केली घोषणाबा

भगूर येथे दोन्ही शिव सेना समोर समोर राजाभाऊ वाजे यांच्या प्रचार्थ आज भगूर मध्ये रैली काढण्यात आली आहे आत्ताच शिंदे गटात गेलेले विजय करंजकर यांच्या घरासमोर ठाकरे गटाची रैली आल्याने करंजकर यांच्या कार्यकर्त्यांनी घोषणा दिली.

18 May 2024, 11:41 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates : राज ठाकरेंचा आदेश 

राज ठाकरे यांनी घाटकोपरमध्ये मनसे सैनिकांसोबत संवाद साधला.निवडणूक मतदानाला उरले अवघे दोन दिवस,घरोघरी जाऊन प्रचार करा,मतदारांना मतदान करण्यासाठी घराबाहेर काढा. महायुतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी काम करा.
मनसे सैनिकाना दिला आदेश

18 May 2024, 11:38 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates : शिवसैनिकांवर गुन्हा दाखल 

मुलुंड मधील राड्यानंतर शिवसैनिकांवर निवडणूक आयोगाने केला गुन्हा दाखल

सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी केला गुन्हा दाख

18 May 2024, 11:01 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates : मल्लिकार्जून खरगे यांचे भाजपवर आरोप 

धोका व विश्वासघाताने या राज्यातील सरकार बनवले आहे. याचे समर्थनही पंतप्रधान करतायत. समाज तोडण्याची ते नेहमी भाषा करतायत. आतापर्यंत कुठल्याच पीएमने असं भडकावण्याचे काम केले नाही. - मल्लिकार्जून खरगे

धमकी, लालच दाखवून विरोधकांत फूट पाडली जातंय. सर्व मोदींच्या इशा-यावर चालतंय.पण निवडणुकीत तसं होत नाहीय. इथं जनता जिंकेल

प्रत्येक ठिकाणी तोडफोडीचे राजकारण करतायत. ४८ पैकी ४६ जागा आम्हाला मिळतील - मल्लिकार्जून खरगे

18 May 2024, 10:48 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates : इंडिया आघाडीची पत्रकार परिषद

उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल - उद्धव ठाकरे 
भाजप आता आरएसएसवरही बंदी लावेल - उद्धव ठाकरे
अच्छी दिनची सुरुवात 4 जूनपासून होईल - उद्धव ठाकरे  

18 May 2024, 10:06 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates : मुंबई, महाराष्ट्राची लूट इंडिया आघाडी थांबवेल - उद्धव ठाकरे 

इंडिया आघाडीने लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी शरद पवार, उद्धव ठाकरे, मल्लिकार्जुन खरगे, संजय राऊत ही मंडळी उपस्थित आहेत. 

 

18 May 2024, 10:05 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates : मुख्यमंत्री ठाणे पिंजून काढणार 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज ठाणे शहर मतदारसंघ पिंजून काढणार आहेत. मीरा-भाईंदर, ओवळा माजिवडा, कोपरी-पाचपाखाडीत एकनाथ शिंदेंचा आज रोड शो होणार आहे. ठाण्याचे उमेदवार नरेश म्हस्केंसाठी शिंदे रोड शो काढतील. ठाण्यात राजन विचारे विरुद्ध नरेश म्हस्के असा सामना होतोय.. 

18 May 2024, 09:59 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates : -प्रचाराच्या शेवटच्या दिवशी इंडिया आघाडी कोणती चाल चालण्याच्या तयारीत?

-इंडिया आघाडीची थोड्याच वेळात पत्रकार परिषद सुरू होणार आहे...
-उद्धव ठाकरे, खरगे, शरद पवारांची संयुक्त पत्रकार परिषद होणाराय...
-प्रचाराच्या शेवटच्या दिवशी इंडिया आघाडीची पत्रकार परिषद...

18 May 2024, 09:58 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates : 'टू द पॉईंट' मुलाखतीत मुख्यमंत्री शिंदेंनी हे महत्त्वाचं विधान 

बाळासाहेब मोठ्या मनाचे होते, त्यांनी भुजबळांना माफ केलं होतं.. असं म्हणत भुजबळांवरुन राज ठाकरेंच्या भूमिकेला मुख्यमंत्री शिंदेंनी छेद दिलाय.. ज्या भुजबळांनी बाळासाहेब ठाकरेंना अटक करण्याचा प्रयत्न केला. त्याच भुजबळांच्या मांडीला मांडी लावून उद्धव ठाकरे बसले अशी टीका राज ठाकरेंनी केली होती. त्यावरुन भुजबळही राज ठाकरेंवर बरसले होते.. भुजबळ-राज वादावर मुख्यमंत्री शिंदेंनी सूचक विधान केलंय.. झी २४तासचे संपादक कमलेश सुतार यांना दिलेल्या 'टू द पॉईंट' मुलाखतीत मुख्यमंत्री शिंदेंनी हे महत्त्वाचं विधान केलंय..