काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीचे जागा वाटप, विखे-पाटीलांची दांडी
काँग्रेस राष्ट्रवादी आणि घटक पक्षांच्या संयुक्त पुरोगामी महाआघाडीचे जागावाटप झाल्याचे घोषीत करण्यात आले.
मुंबई : काँग्रेस राष्ट्रवादी आणि घटक पक्षांच्या संयुक्त पुरोगामी महाआघाडीच्या घोषणेला चार महिन्यानंतर अखेर मुहूर्त मिळाला. आज मुंबईत महाआघाडीची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेला काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दांडी मारली. पत्रकार परिषदेत महाआघाडीचे जागावाटप झाल्याचे घोषीत करण्यात आले. यात काँग्रेस २४ जागा, राष्ट्रवादी काँग्रेस २० जागा, स्वाभीमानी शेतकरी संघटना २ जागा, बहुजन विकास आघाडी १ तर युवा स्वाभीमानी पक्ष १ जागा लढवणार असल्याचे जाहीर करण्यात आले. यावेळी अजित पवारांनी प्रकाश आंबेडकरांवर सडकून टीका केली.
महाआघाडीचे जागा वाटप झाले आहे. राजकीय पक्ष आणि संघटना मिळून ५६महाआघाडीत सहभागी झाल्या आहेत. काँग्रेस २४ आणि राष्ट्रवादी २० लढविणार आहे. स्वाभीमानी शेतकरी संघटना (हातकणंगले, दुस-या जागेची अद्याप निर्णय नाही) दोन जागा तर बहुजन विकास आघाडी (पालघर) एक जागा आणि युवा स्वाभीमानी पक्ष (अमरावती) एक जागा सोडण्यात आली आहे. दरम्यान, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज पत्रकार परिषेदेला दांडी मारली. राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा सुजय भाजपमध्ये दाखल झाला आहे. सुजय यांना अहमदनगरमधून भाजपची लोकसभा उमेदवारीही जाहीर झाली आहे. त्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील यांनी दांडी मारल्याची चर्चा आहे.
पत्रकार परिदेतील ठळक बाबी
- काँग्रेस, राष्ट्रवादी व घटक पक्षांच्या संयुक्त पुरोगामी महाआघाडीच्या घोषणेला चार महिन्यानंतर मुहूर्त
- चार महिने सुरू होते चर्चेचे गुर्हाळ
- मात्र महाघाडीच्या घोषणेला अपशकुन
- महाघाडीच्या पत्रकार परिषदेला विरोधी पक्षनेते विखे पाटील गैरहजर
- पत्रकार परिषदेतच्या आधी सर्व पक्षांच्या झालेल्या बैठकीलाही राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित नव्हते
- विखे पाटील महत्वाची पत्रकार परिषद सोडून मतदारसंघात
संयुक्त पुरोगामी महाआघाडीची घोषणा आहे, त्या पत्रकार परिषदेला राजू शेट्टी आले आहेत
अजित पवार यांची प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीका
- आम्ही आघाडीत त्यांना जागा सोडायला तयार होते
- मात्र त्यांना आघाडीत यायचेच नव्हते
- ते भाजपाची बी टीम म्हणून राज्यात काम करतायत
- भाजपाला फायदा करून द्यायचा होता म्हणून चर्चेचे सोंग केले
- भाजपाला २५ टक्के उमेदवार काँग्रेस व राष्ट्रवादीमधून घ्यावे लागेल
- जर चांगले काम केले आहे तर ही वेळ का यावी
जयंत पाटील, शेकाप
- ५२ वर्षानंतर आम्ही पहिल्यांदा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला
- मतांची विभागणी होऊ नये म्हणून हा निर्णय
अशोक चव्हाण, काँग्रेस प्रदेशअध्यक्ष
विखे पाटील भाजपचा प्रचार करत आहेत या प्रश्नावर अशोक चव्हाण म्हणालेत.
- ते दुसर्या पक्षचा प्रकार करतील असं वाटत नाही, मी वस्तुस्थिती समजून घेईन
- रत्नागिरी - सिंधुदुर्ग मतदारसंघातील उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकर यांच्याबाबत माध्यमात जी माहिती समोर आली
- पक्षाने सविस्तर माहिती घेतली आहे, अहवाल आला आहे, त्यावर पक्ष निर्णय घेईल