मुंबईकरांची झोप उडणार! `या` तारखांना लागणार Mega Block, जाणून घ्या schedule
मनमाड स्थानकातून जाणाऱ्या 33 गाड्यांचे मार्ग बदलण्यात आलयाने नाशिक जळगाव सह अर्ध्या महाराष्ट्रातील प्रवश्यना अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे.
योगेश खरे, झी मीडिया: उद्या मेगाब्लॉकमुळे मुंबईकरांची झोप उडणार आहे. उद्याच्या या मेगाब्लॉकमुळे सगळ्यांची गेैरसोय होणार आहे. तेव्हा जाणून घेऊया उद्याच्या आणि येत्या काही मेगाब्लॉकविषयी. भायखळा येथील एक जुना पूल पाडण्यात येणार आहे. त्यामुळे मॅगाब्लोकचा (Megablock)त्रास प्रवाशांना सहन करावा लागणार आहे. हा मेगाब्लॉक 19 नोव्हेंबर ते 21 नोव्हेंबर पर्यंत राहणार आहे. या मेगाब्लॉकमुळे पुन्हा एकदा प्रवाशांची त्रेधातिरपिट होणार आहे. सध्या लग्नसराईचाही (Wedding Season) मौसम आहे त्यामुळे आपल्याला लोकलनं प्रवास करणं अनिवार्य आहे. त्यासाठी आता आपल्याला प्रवास करताना बराच त्रासही सहन करावा लागणार आहे. त्यामुळे लग्नसराईच्या लगबगीत आपला रेल्वे प्रवास अडचणीत येऊ शकतो कारण भायखळाजवळील जुना कर्नाक ब्रीज पाडण्यासाठी तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (Chhatrapati Shivaji Maharaj Terminals) येथेही फलाट वाढवण्याचे काम सुरू असल्याने 27 तासांचा मेगाब्लॉक सुरू घेण्यात येणार आहे. (long distance trains cancelled in mumbai during mega block 19 to 21 november)
त्यामुळे पुढील 19 नोव्हेंबर शनिवारपासून सोमवारपर्यंत मुंबईकडे जाणाऱ्या आणि मुंबईहून (Mumbai) येणाऱ्या 36 रेल्वे रद्द केल्या आहेत. मनमाड स्थानकातून जाणाऱ्या 33 गाड्यांचे मार्ग बदलण्यात आलयाने नाशिक जळगाव सह अर्ध्या महाराष्ट्रातील प्रवश्यना अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे.
हेही वाचा : Viral News: महिलेनं वाचवले Kobra चे प्राण... थराराक दृश्ये कॅमऱ्यात कैद
19 नोव्हेंबरला रद्द झालेल्या गाड्या :
पुणे-मुंबई इंटरसिटी एक्स्प्रेस, (Pune-Mumbai Intercity Express)
नांदेड-मुंबई तपोवन एक्स्प्रेस, (Nanded-Mumbai Tapovan Express)
हैदराबाद-मुंबई- हुसेनसागर एक्स्प्रेस, (Hydrabad-Mumbai-Hussainsagar Express)
अमरावती-मुंबई एक्स्प्रेस, सिकंदराबाद-मुंबई (Amravati-Mumbai Express, Sikandarbad-Mumbai)
हेही वाचा : बाबोsss...हा तर जणू स्वर्गच, हे भन्नाट जग पाहून तुम्हाला मोह आवरता येणार नाही....
मध्य रेल्वेवर कुठे मेगाब्लॉक?
माटुंगा - मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर कधी - सकाळी 11.05 ते दुपारी 3.55 पर्यंत
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.25 ते दुपारी 3.35 पर्यंत सुटणाऱ्या डाउन जलद सेवा माटुंगा आणि मुलुंड दरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळवल्या जाऊन त्यांच्या संबंधित वेळापत्रकानुसार स्थानकांवर थांबतील. ठाण्याच्या पलीकडे या जलद गाड्या पुनश्च: डाउन जलद मार्गावर वळवल्या जातील आणि निर्धारित वेळेपेक्षा 15 मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील. ठाणे येथून सकाळी 10.50 ते दुपारी 3.46 वाजेपर्यंत सुटणाऱ्या अप जलद सेवा मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप धीम्या मार्गावर त्यांच्या संबंधित वेळापत्रकानुसार स्थानकांवर थांबवल्या जातील. त्यापुढे या अप जलद सेवा अप जलद मार्गावर वळविल्या जातील व नियोजित वेळेपेक्षा 15 मिनिटे उशिराने धावतील.
हार्बर मार्गावर कुठे?
पनवेल- वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर कधी - सकाळी 11.05 ते सायंकाळी 4.05 पर्यंत. मात्र बेलापूर/नेरुळ-खारकोपर सेवा प्रभावित होणार नाही.
पनवेल येथून सकाळी 10.33 ते दुपारी 3.49 वाजेपर्यंत सुटणाऱ्या व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 या वेळेत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
पनवेल येथून सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 वाजेपर्यंत सुटणाऱ्या व ठाण्याकडे जाणाऱ्या अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून सकाळी 10.01 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत पनवेलकडे जाणाऱ्या डाउन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
ब्लॉक कालावधीत बेलापूर/नेरुळ आणि खारकोपर दरम्यानच्या उपनगरीय रेल्वे सेवा वेळापत्रकानुसार धावतील. ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असेल.