मुंबई : मुंबईतला लोअर परळ रेल्वे स्थानकाजवळचा पूल पादचाऱ्यांसाठी खुला करण्यात आला आहे. वाहनांसाठी मात्र बंदी कायम आहे. पूर्वकडून पश्चिमेकडे जाण्यासाठी पूल खुला झाला आहे. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.  पूल बंद असल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली होती. विविध पथकांच्या तपासणीनंतर पूल धोकादायक असल्याचं प्रशासनानं जाहीर केलं होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंधेरी भागातील गोखले पूल कोसळून घडलेल्या दुर्घटनेनंतर प्रशासनानं मुंबईतील अंधेरी, मालाड, वसई या भागांतील काही भाग वाहतुकीसाठी बंद केला. त्यातच  मंगळवार, २४ जुलैपासून वर्दळीचा असा लोअर परेल स्टेशनबाहेरचा डिलायल रोडओव्हर ब्रिज वाहतुकीसाठी आणि पायी चालणाऱ्यांसाठीही पूर्णत: बंद करण्यात आला होता. 


विशेष म्हणजे, या पुलाचं काम अद्यापही सुरू झालेलं नाही. मात्र, हा पूल आता पादचाऱ्यांसाठी खुला करण्यात आलाय.